Subscribe Us

header ads

रस्त्यात अडवून बळजबरीने मजूराला पाजले विष ? Rastyat adavun badajbrine majurala pajale vish ?

 गडचांदूर:-#Korpanalivenews.
    ऊसतोडणीसाठी दिलेल्या पैशांच्या वादात जिवती तालुक्यातील एका मजुराला गडचांदूर पोलीस स्टेशन हद्दीतील इसापुर,भेंडवी रस्त्यावर अडवून दोन जणांनी बळजबरीने विष पाजून पसार झाल्याची गंभीर घटना 10 नोव्हेंबर रोजी समोर आली आहे.दत्ता मल्लपा कंदमुळे वयवर्ष अंदाजे 50 रा. पल्लेझरी असे मजुराचे नाव असून घटनेनंतर मजुराने स्वतः ग्रामीण रुग्णालय गाठले.सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून माहिती मिळताच पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन त्याचे बयान नोंदविले आहे.
       दत्ता हा मोलमजुरी करून पोटभरतो.त्याला दोन मुले असून ते वेगळे राहतात आणि पत्नी गेल्या अंदाजे 10 वर्षापासून जवळ नसल्याने तो सध्या एकटाच राहतो.सदर घटने प्रकरणी दत्ताने दिलेल्या बयानावरून सविस्तर असे की,गेल्या दोन महिन्यापूर्वी दत्ता कंदमुळे यांनी ऊसतोडणीच्या कामावर येण्यासाठी जिवती तालुक्यातील घनपठार येथील एका व्यक्तीकडू 25 हजार रुपये घेतले होते.मात्र ते लोकं याला एकटेच दुसऱ्या ठिकाणी नेत होते.त्यांनी याला रात्री त्याच्या घरात नजरबंद करून ठेवले होते. खरच हे लोक ऊसतोडणीसाठी नेत आहे की यांची इतर काही योजना आहे अशी शंका दत्ताच्या मनात आली."कुठेही जायचं नाही,गेलाच तर थोंडाच घालतो"  असे दम ते दत्ताला देत होते.ते दारूच्या नशेत झोपल्यानंतर दत्ता रात्री उशिरा कसाबसा घरातून बाहेर पडला आणि जंगलात जाऊन लपला.नंतर 2,3 दीवसाने नातेवाईकांकडे जातो म्हणून दत्ता एका दुचाकीस्वार सोबत भेंडवी फाटा येथे उतरला व पायदळ गडचांदूरकडे येत असताना शोधात असलेल्या त्या दोन व्यक्तींनी याला गडचांदूर जवळील इसापुर रस्त्यावर अडवून बळजबरीने एक बॉटल तोंडात कोंबून विष पाजले व दत्ता यांनी गच्चपणे धरलेली बॉटल सोडून पसार झाले.त्यांनी पाजलेले विष काही पोटात गेले बाकी काही थुंकून दिले.तरी सुद्धा हलकीशी नशा येत असल्याने एका दुचाकीस्वाराला हात दाखवून दत्ता पोलिस ठाण्यात आला.त्याठिकाणी उपस्थित एका पोलीस महिला कर्मचाऱ्यांनी याला पहिले दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला आणि तो ग्रामीण रुग्णालयात आला असे दत्ताचे म्हणणे आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती धोक्याबाहेर आहे.दत्ता यांनी दिलेल्या बयानावरून पोलीस तपास करीत असून याप्रकरणी काय समोर येते याकडेसर्वांचे लक्ष लागले आहे.दत्ताने दिलेल्या बयानावरून सदर घटना अतिशय गंभीर असून पोलिसांनी यासंदर्भात सखोल चौकशी करून यातील खरे चित्र समोर आणावे,जेणेकरून भविष्यात अशा घटनांवर अंकुश बसेल,असे मत व्यक्त होत आहे.
Stopped in the road and forcefully poisoned the laborer?
                          -------//-----
    मुख्यसंपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049356899,9595630811


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या