मुंबई:-#Sanjay Raut bail news.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ,फायरब्रेंड नेता खासदार संजय राऊत यांना 9 नोव्हेंबर रोजी PMLA कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.ही बातमी ऐकून महाराष्ट्र भरातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून,पेढे वाटून जल्लोष साजरा केला.पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आरोप असलेले संजय राऊत हे 102 दिवसानंतर कारागृहातून बाहेर आले आहे.दरम्यान राऊत यांना जामीन मंजूर झाल्यानंतर सुषमा अंधारेंच्या डोळ्यात आनंदाश्रू पहायला मिळाले. "टायगर इज बॅक" अशा आशयाचं ट्वीट अंधारे यांनी केलं होतं.दरम्यान एका टीव्ही चॅनेल सोबत संवाद साधताना सुषमा अंधारे यांना अश्रू अनावर झाले.संजय राऊत यांना जामीन मिळाल्यामुळे आनंद झाल्याचंही त्यांनी म्हटलं.शिवाय संजय राऊत यांच्यामुळे आम्हाला दहा हत्तींचं बळ मिळतं,असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.यापुढे बोलताना सुषमा अंधारे यांना गहिवरुन आलं होतं. त्यांचे डोळे आनंदाश्रूंनी पाणावले होते.जामीनावर स्थगती मिळावी यासाठी ईडीने ED हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली मात्र हायकोर्टाने याचिका फेटाळली.अखेर संजय राऊत कारागृहा बाहेर आले असून शिवसैनीकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. राऊत बाहेर आल्याने कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळीच उर्जा संचारल्याचे चित्र पहायला मिळत असून कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. सुषमा अंधारे यांनी उपस्थिती शिवसैनिकांना पेढे वाटून आनंद साजरा केला.शिवसैनीकांची ही खऱ्या अर्थाने दिवाळीच असून सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील राजकारणात राऊत यांच्या पुढील वाटचालीवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tears of joy in the eyes of Sanjay Raut as soon as he got bail.
-------//-------
0 टिप्पण्या