Subscribe Us

header ads

अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याचं समर्थन नाहीच ! "उपमुख्यमंत्री फडणवीस"Abdul Sattar's statement is not supported ! "Deputy Chief Minister Fadnavis"

मुंबई:-#Political News.
  पुरोगामी महाराष्ट्राचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या,खासदार सुप्रिया सुळे,यांच्या संदर्भात अपशब्दांचा वापर करून वादग्रस्त विधान केल्याने अख्ख्या महाराष्ट्रात सत्तार यांच्यावर टीकेची झोड उसळली आहे.ठिकठिकाणी सत्तार यांनी केलेल्या त्या विमानाचं तीव्र शब्दात निषेध केला जात आहे.राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून निषेध नोंदवित आहे.संतप्त प्रतिक्रिया उमटत असून आंदोलन करत सत्तार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे.सत्तार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने रेटून धरली असून जोपर्यंत राजीनामा देणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील.अशी भूमिका घेण्यात आल्याचे चित्र आहे.दरम्यान भाजप नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अब्दुल सत्तार यांच्या विधानाला विरोध असल्याचे स्पष्ट केले आहे. एकूणच भाजपच्या वरिष्ठ नेत्याने सत्तार यांच्या विधानाचा विरोध करत राजकारण खूप खालच्या थराला जात असल्याचे मत व्यक्त केले आहे. कोणत्याही महिलाबद्दल अपशब्द बोलू नये,ते अतिशय चुकीचे आहे,आम्ही त्याचा विरोधच करू,अशी भुमिका उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली आहे.
  फडणवीस पुढे म्हणाले,जशी आमच्या लोकांना लागू आहे.तसे त्यांच्याही लोकांना लागू आहे.मला त्याच्यात जायचे नाही,राजकारणात आचारसंहिता पाळली गेली पाहिजे असं मत फडणवीस यांनी मांडले.सत्तार यांनी केलेल्या विधानाचे मी समर्थन करणार नाही पण,खोके आणि अजून काय काय,असे म्हणत फडणवीस यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे.त्यामुळे दोन्ही बाजूने आचारसंहिता पाळली गेली पाहिजे,राजकारणात पातळी खूप खालच्या स्तरावर गेली असून दोन्ही बाजूच्या मोठे नेत्यांनी हे सांगितले पाहिजे असेह फडणवीस म्हणाले.अन्यथा खालच्या नेत्यांनी वेगळं बोलायचं आणि मुख्य नेत्यांनी वेगळं बोलायचं,असं योग्य होणार नाही.महाराष्ट्राच्या राजकारणात असं व्हायला नको,असेह फडणवीस म्हणाले.एकूणच देवेंद्र फडणवीस यांनी अब्दुल सत्तारांनी केलेल्या विधानाचा विरोध केला असून महाराष्ट्रातील राजकारण खालच्या पातळीवर जायला नको असे मत मांडले आहे.
Abdul Sattar's statement is not supported ! "Deputy Chief Minister Fadnavis"
                            -------//-------
मुख्यसंपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या