Subscribe Us

header ads

शेतकरी संघटनेचा सत्कार सोहळा.Shetakari Sanghatanecha satkar sohada.

कोरपना:-@Satkar Sohada.
  कोरपना तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत शेतकरी संघटनेचे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार सोहळा 17 नोव्हेंबर रोजी कोरपना येथे आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी नेते,माजी आमदार अँड.वामनराव चटप होते.यावेळी सर्व नवनिर्वाचितांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच काँग्रेस मधून शेतकरी संघटनेते प्रवेश केलेले सुनील बावणे यांना माजी आमदार अँड.वामनराव चटप यांनी संघटनेचा बिल्ला लाऊन रितसरपणे संघटनेत प्रवेश देऊन स्वागत केले तसेच शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यानिमित्ताने सुनील बावणे यांची शेतकरी संघटना कोरपना शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.सदर सत्कार कार्यक्रमात तालुक्यातील विविध ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच,सदस्य तसेच शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्षाच्या विविध आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्यासंखेने उपस्थिती होती.माजी आमदार अॕड.वामनराव चटप यांनी वेगळा विदर्भ व इतर मुद्यांवर सखोल मार्गदर्शन केले.
felicitation of the newly elected sarpanch,deputy sarpanch and members of farmers association.
                           -------//-------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या