Subscribe Us

header ads

चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा दारूबंदीचे संकेत.Signs of liquor ban again in Chandrapur district.

चंद्रपूर:-@BJP News.
       दारूमुळे सर्वात जास्त प्रभावित महिलावर्ग होत असून महिलांची पिळवणूक व छळ होतो त्यामुळे काही भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात पुन्हा दारूबंदी करावी अशी मागणी केल्याची माहिती भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ या चंद्रपुर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या असतांना शहरातील एन.डी हॉटेल मध्ये रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.त्यामुळे चंद्रपुर जिल्ह्यात पुन्हा एकदा दारूबंदीचे संकेत त्यांनी दिले आहे. पत्रपरिषदेत महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष वनिता कानडे,महानगर अध्यक्षा अंजली घोटेकर,ग्रामीण जिल्हाध्यक्षा अलका आत्राम संजय गजपुरे,सुभाष कासनगोट्टूवार आदी भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.       2014 मध्ये राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार आले. त्यानंतर राज्याचे अर्थ,वन व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 2015 मध्ये जिल्ह्यात दारूबंदी केली.त्यानंतर मात्र ठिकठिकाणी गल्ली-बोळात अवैध दारू विक्रीला उत आले.आणि दारूबंदी फसली म्हणून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सत्ताधारी पक्षाला चांगलेच धारेवर धरले.त्यानंतर 2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताच राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्याची दारूबंदी हटवली. त्यानंतरही आता जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी जिल्ह्यात पुन्हा एकदा दारूबंदीचे संकेत दिले आहे.
       पत्रकार परिषदेत महिला अत्याचार,लव जिहाद, मुलीला पडवून नेणे,धर्मांतर करणे,बळजबरीने लग्न लावणे व गर्भवती झाल्यावर सोडून देणे,पक्ष संघटन इतर मुद्यांवरही त्या बोलल्या परंतू ठिकठिकाणी फक्त दारबंदी संदर्भात चर्चा ऐकायला मिळत आहे.खरच पुन्हा एकदा जिल्ह्यात दारूबंदी होणार का ? याविषयी अनेक तर्कवितर्क लढविले जात आहे.  bann alcohol again in Chandrapur district.
                          ------//------
  मुख्यसंपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या