गडचांदूर:-#Tiger Terror news.
कोरपना तालुक्यातील विरुर गाडेगाव वेकोली विरूर कोळसा खाणी परिसरात गेल्या 15 ते 20 दिवसांपासून वाघाचा मुक्त संचार सुरू आहे.या वाघाने मुंगोली ते विरूर कोळसा खाणी परिसरात चांगलाच धुमाकूळ घातल्याचे चित्र पहायला मिळत आहे. Terror of the tiger.दिवस व रात्रीच्या सुमारास अनेक लोकांना वाघोबाचे दर्शन झाले आहे.अनेकांनी वाघाच्या मुक्त संचाराचे दृश्य कॅमेरात कैद केले आहे. वेकोली कामगार,परिसराच्या गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणनिर्माण झाले असून वाघाची दहशत पसरली आहे.विरूर पैनगंगा नदीपात्रात पुलाची निर्मिती झाल्याने हा मार्ग गडचांदूर ते घुग्घुस,शिंदोला, चंद्रपूर,वणी,यवतमाळकडे जाण्यासाठी अगदी सोयीचे अनेक जण दुचाकी,चारचाकी वाहनाने प्रवास करतात. हंगामाचे दिवसअसल्याने शेतात सोयाबीन,कापूस या शेतपिकांची कंपनीसाठी शेतकऱ्यांना शेतात जावे लागत आहे.

असे असताना परिसरात वाघाचा मुक्त संचार जीवाला धोका निर्माण करणारा ठरत आहे. तसेच विरूर वेकोली कोळसा खाणीत स्थानिकांपेक्षा परराज्यातील कामगार मोठ्याप्रमाणात याठिकाणी काम करीत आहे.या वाघाचे वेकोली विरूर तसेच मुंगोली परिसरात वास्तव्य व फिरत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत असून वनविभाने या वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
'Tiger' terror in Virur (Gadegaon) Vekoli area.Many have captured the sight of the tiger's free movement on camera.
-------//-------
0 टिप्पण्या