Subscribe Us

header ads

विनयभंग प्रकरणी फरार आरोपीला अटक. Vinayabhang prakarani pharar aropila ataka.

गडचांदूर:-#Gadchandur Police.
    गडचांदूर येथील गुन्हेगार अब्दुल खलील अब्दुल रशीद शेख वयवर्ष 24 हा मागील काही दिवसापासून गडचांदूर येथील एका महिलेचा विनयभंग करून फरार झाला होता.दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे गडचांदूर पोलिसांनी सदर आरोपीचा वाशिम, यवतमाळ,अमरावती जिल्ह्यात शोध घेऊन 7 नोव्हेंबर रोजी त्याला ताब्यात घेऊन विनयभंग व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली व चंद्रपूर येथे न्यायालयात हजर केले.विद्यमान न्यायालयाने आरोपीची कारागृहात रवानगी केली असून सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सत्यजित आमले व पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांनी यशस्वीपणे पार पाडली.Fugitive accused arrested in molestation case.
  सदर गुन्हेगार गेल्या दोन वर्षांपूर्वी येथील एका वृद्ध महिलेवर बलात्कार करून त्याची हत्या केल्या प्रकरणी कारागृहात होता.त्यातून सुटका झाल्यानंतर सदर गुन्हेगाराने शहरात दहशतीचे वातावरण निर्माण करून शहरातील बऱ्याच महिलांवर बलात्काराचा प्रयत्न केल्याचे तसेच वार्डात उभा राहून अश्लील चाळे करून महिला व मुलींची अनेकदा छेड काढल्या प्रकरणी सदर व्यक्ती मानवी समाजाला काळीमा फासणारी असल्याचे म्हणत याला तात्काळ अटक करून ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा,याला आजन्म जिल्हा बंदी करावी अशी मागणी वार्डावासीयांनी गडचांदूर पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली होती. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता गडचांदूर पोलिसांनी सदर आरोपीला अटक केली व विद्यमान न्यायालयाने त्याची रवानगी कारागृहात केली आहे.
Vidyamāna nyayalayane tyachi ravanagi karagrrhat keli ahe.                   
                          -------//-------
 मुख्यसंपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या