Subscribe Us

header ads

दिलेल्या मुदतीत मागणी पूर्ण करा अन्यथा रेल रोको...! Warning to stop train if demand is not met within time.

बल्लारपूर:-@Railway Bridge Accident.
      बल्लारपूर रेल्वे पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेची माजी पालकमंत्री,आमदार विजय वडेट्टीवार यांनी रेल्वे स्टेशनला जाऊन घटनास्थळाची पाहणी केली व संविबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.Ballarpur railway bridge accident दरम्यान पत्रकारांना माहिती देताना वडेट्टीवार यांनी सांगितले की,खरं तर रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणा व दुर्लक्षितपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे आरोप त्यांनी यावेळी केले.45,50 वर्षापूर्वीचा हा पुल असून याची दुरूस्ती नाही,आॕडिट नाही,आम्ही सांगितले की,याची रिस्पॉन्सबिलीटी फिक्स करा,त्याच्यावर कारवाई करा आणि रेल्वे मंत्र्यांनी काल मृतकांना 5 लाख रुपयांची थातूरमातूर मदत जाहीर केली मात्र यांना 25 लाखांची मदत आणि नोकरी देण्याची मागणी आम्ही केली आहे असे वडेट्टीवार म्हणाले.याप्रकारच्या घटना वारंवार होतात त्यामध्ये बल्लारशाह हा असा रेल्वे स्टेशन आहे.
      नागपूर नंतर दुसऱ्या क्रमांकाचा हा मोठा जंक्शन असल्याने येथे मोठी वर्दळ असते.आणि गेल्या दीड वर्षांपूर्वी घोषणा झाली होती की,ईकडे सिनीअर सिटीजनसाठी लिफ्ट Lift for Senior Citizens करू,याचा कायापालट करू,मात्र निव्वळ रंगरंगोटी पलिकडे काहीच सोईसुविधा याठिकाणी दिल्या नाही. याठिकाणी एकच ब्रीज आहे,दोन करायला पाहिजे,5 प्लेटफार्म आहे.या सगळ्या गोष्टी आम्ही सांगितल्या आणि याबरोबरच यामध्ये जबाबदारी फिक्स केली गेलीच पाहिजे,लिफ्ट लवकरात लवकर दुरुस्त करा, आॕडीट झाला नसेल तर जबाबदारी फिक्स करा आणि सुदैवाने दुर्घटनेच्या वेळी रेल्वे आली नव्हती,जर रेल्वे ट्रॅकवर असती तर प्रचंड मोठी दुर्घटना घडली असती आणि अनेक लोकांचा मृत्यू झाला असता.या घटनेला जे जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, जखमींना मोठ्याप्रमाणावर मदत द्यावी अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.नाही झाली तर एक दिवस रेल रोको करू,येथील सोईसुविधा व दोषींवर कारवाई,त्यांचा चौकशी अहवाल पुर्ण होण्यासाठी त्यांनी मागितलेल्या प्रमाणे आम्ही 1 महिन्याची मुदत त्यांना दिली असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी यावेळी दिली.यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्यासंखेने उपस्थिती होती.
Ballarpur railway bridge accident.
Warning to stop train if demand is not met within time.
                        --------//------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या