Subscribe Us

header ads

समृद्धी महामार्गावर 15 डिसेंबरपासून धावणार लालपरी. Lalpari will run on Samriddhi Highway from December 15.

नागपूर:-@Samriddhi Highway.
   नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूरात झाले.नागपूर ते शिर्डी हा अंतर आता अवघ्या 5 तासात पार होणार आहे.असे असताना आता एसटी महामंडळाने ST Corporation महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून नागपूर ते शिर्डी विनावातानुकुलित एसटी बस सेवा 15 डिसेंबरपासून समृद्धी महामार्गावरून सुरू होणार आहे.नागपूरातील गणेशपेठ येथून रात्री 9 च्या सुमारास बस शिर्डीकडे कूच करेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 5/30 वाजताच्या जवळपास शिर्डी येथे पोहोचेल.त्याच बरोबर परतीच्या प्रवासासाठी शिर्डी येथून रात्री 9 ला सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 5/30 वाजताच्या जवळपास नागपूरात दाखल होईल.यासठी नागपूर ते शिर्डी विनावातानुकुलित एसटीची तिकीट 1300 रूपये असेल.लहान मुलांसाठी 670  प्रवास भाडे आकारण्यात येणार आहे.75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येईल.तर 65 वर्षांवरील नागरिकांना 50 टक्के सवलत तिकिटांवर देण्यात येणार असल्याचे कळते.एकुणच 15 डिसेंबरपासून या समृद्धी महामार्गावरून नागरिक एसटी बस(लालपरी)ने प्रवासाचा आनंद घेणार आहेत.
Lalpari will run on Samriddhi Highway from December 15.
                          --------//-------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या