Subscribe Us

header ads

ग्रामीण क्षेत्रातील रस्ते काँक्रिटीकरणासाठी 20 कोटी. 20 crores for concreting roads in rural areas.

चंद्रपूर:-@Road concreting.
 चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीय रस्ते,वाहतूक व महामार्ग मंत्री 'नितीन गडकरी' यांनी चंद्रपूर मतदारसंघातल्या ग्रामिण क्षेत्रातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी 20 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला असून यातून आता ग्रामिण भागातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण होणार असल्याची माहिती आहे.MLA Jorgewar's demand is successful,20 crores approved for road concreting.निधी मंजूर केल्याबदल आमदार किशोर जोरगेवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अभार मानले आहे. MLA Jorgewar's demand succeeded.
         चंद्रपूर मतदार संघातील विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे दिसत असून या क्षेत्राच्या सर्वसमावेशक विकासासाठी मोठा निधी आमदार किशोर जोरगेवार MLA Kishore Jorgewar  यांनी उपलब्ध करून दिला आहे.या निधीतून शहरी व ग्रामीण क्षेत्रात विकासकार्य सुरू आहे.दरम्यान ग्रामीण क्षेत्रातील रस्ते तयार करण्याच्या दृष्टीने आमदार जोरगेवार यांनी केंद्रीय राखीव निधीतून 20 कोटी रूपये मंजूर करण्याची मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती.या मागणीची दखल ना. नितीन गडकरी यांनी घेतली असून ग्रामीण क्षेत्रातील रस्त्यांच्या बांधकामासाठी 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.यातून साखरवाही,येरूर,वांढरी, एमआयडीसी,दाताळा या 10 की.मी.पर्यंतच्या मार्गाचे 10 कोटी तर शेनगाव,उसेगाव,वढा,धानोरा,पिपरी, मारडा,शिवनी या 10 कि.मी.मार्गाचे 10 कोटी असे 20 कोटी रूपये खर्च करून काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे.विशेष म्हणजे या अगोदरही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ग्रामीण क्षेत्राच्या रस्त्यांसाठी 19 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता.मागणीची सकारात्मक दखल घेत निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल आमदार किशोर जोरगेवार यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहे.
MLA Jorgewar's demand is successful, 20 crores approved for road concreting.
                         ------//------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049356899,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या