नागपूर:-@Winter session..
माझ्या बारामतीच्या एका दौऱ्यामुळे अजीत पवार यांच्यावर एवढा फरक पडला की ते माझा करेक्ट कार्यक्रम करायला निघाले आहे.करेक्ट कार्यक्रम कुणाचा करायचा हे जनता 2024 मध्ये ठरवेल.या निवडणुकीत महाविकास आघाडीला उमेदवार देखील भेटणार नाही,असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलतांना केला. Kona Kuncha Karect Karyakram Karate he Janata 2024 Madhy Tharvel.
बारामती विकास म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा विकास नाही.अजीत पवारांच्या वागण्याबद्दल प्रचंड नाराजी आहे.त्यांचा करेक्ट कार्यक्रम 2024 मध्ये जनता करणार आहे.त्यांचे कुठलेही चॅलेंज आम्ही स्विकारायला तयार असल्याचे बावनकुळे म्हणाले.
राष्ट्रवादी सत्तेत आली तेव्हा सत्तेची फळ अजीत दादांनी चाखले आहे.तरीही पश्चिम महाराष्ट्राचा विकास केला नाही.सत्तेपासून पैसा आणि पैसापासून सत्ता असे त्यांचे राजकारण राहीले आहे.त्यांनी आपल्या पक्षाचे बघायला हवे.ते ओबीसीचे मारेकरी आरोप बावनकुळे यांनी केला.लोकायुक्त कायदा हा महत्वाचा आहे.ज्यांनी 50 वर्ष सत्तेपासून पैसा कमवला.त्यांना लोकायुक्ताची भिती वाटते आहे.घोटाळ्याचे बॉम्ब आमच्या जवळही आहे.पीएमआरडीएमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी किती जमिनी ग्रीनबेल्टच्या यलोबेल्टमध्ये केल्या एवढे जरी मांडले तरी भरपूर आहे.काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भ्रष्टाचाराच्या गोष्टी बंद केल्या पाहिजे,असेही बावनकुळे म्हणाले.
Kona Kuncha Karect Karyakram Karate he Janata 2024 Madhy Tharvel.
-------//------
0 टिप्पण्या