Subscribe Us

header ads

विधिमंडळाचे पुढील अधिवेशन मुंबईत.Vidhimandalache Pudhil Adhivesan Mumbait.

नागपूर:-@Korpanalive..
    राज्य विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनाचे 30 डिसेंबर रोजी सूप वाजले.2 वर्षानंतर झालेल्या शिंदे-फडणवीस सरकाच्या या पहिल्या अधिवेशनाची यावेळी विशेष उत्सुकता होती.पुढील अधिवेशन मुंबईत 27 फेब्रुवारी 2023 रोजी होणार असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांनी केली.19 ते 30 डिसेंबर अशा 10 दिवसांच्या या अधिवेशनात प्रत्यक्षात 84.10 तास कामकाज झाले 8.31 तास वेळ वाया गेला.रोज सरासरी 8.25 तास कामकाज झाले.तारांकित प्रश्नांची संख्या 6846 होती तर 422 प्रश्न स्वीकृत करण्यात आले.उत्तर केवळ 36 प्रश्नांना मिळू शकले.
        यावेळी वैशिष्ट्य म्हणजे 2018 लक्षवेधी प्राप्त झाल्या यातील 333 स्वीकृत करण्यात आल्या तर तब्बल 106 लक्षवेधींवर सभागृहात चर्चा होऊ शकली.महत्वाचे लोकायुक्त विधेयकासह 12 विधेयके यावेळी सभागृहात संमत झाली.विधान परिषदेत संमत झालेली 3 विधेयके संमत झाली.सदस्यांच्या उपस्थितीची कमाल सरासरी 91.32 टक्के तर किमान 50.57 होती.दैनंदिन सरासरीचा विचार करता 79.83% सदस्य सभागृहात उपस्थित होते असेही यावेळी अध्यक्षांनी सांगितले.
Vidhimandalache Pudhil Adhivesan 27 Phebruvarila Mumbait.
                            ------//-------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या