नागपूर:-@Winter session..!
ज्या महाराष्ट्रद्वेषी राज्यपालांनी महाराष्ट्राचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला तसेच, घोटाळेबाज मुख्यमंत्र्यांना वाचविण्यासाठी हा सर्व प्रकार सुरू आहे.एका 32 वर्षाच्या तरूणाने या खोके सरकारला हलवून ठेवले आहे,अशी घणाघाती टीका आदित्य ठाकरे यांनी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना केली.विधिमंडळ अधिवेशनाचा 4 था दिवस,एयु...एयु कौन है ? च्या मुद्याने गाजला.सत्ताधाऱ्यांच्या टार्गेटवर आदित्य ठाकरे असून त्या प्रकरणाची आता एसआयटी SIT मार्फत चौकशी करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर सभागृहातील वर्तनावर आक्षेप नोंदवित टीका केली.ते म्हणाले,लक्ष विचलित करण्याचा सत्ताधाऱ्यांचा हा प्रयत्न आहे.जे काही शोधायचे आहे ते शोधू द्या.महत्वाची गोष्ट म्हणजे एनआयटी NIT चा जो घोटाळा आहे तो आम्हाला सभागृहात मांडू न देण्याचा हा प्रयत्न असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले.
32 Varshannchya Tarunane Khoke Sarkarla halavun thevle ahe.
--------//-------
0 टिप्पण्या