Subscribe Us

header ads

अनुगामी लोकराज्य महाअभियान अंतर्गत महिला संवाद मेळावा.Anugami lokarajya maha abhiyan antargat mahila sanvad medava.

राजूरा:-@Rajura.
मातृशक्ति ही समाज पारिवारीक रचनेतील मुख्य घटक असून घरातील वेगवेगळी भुमीका ती पार पाडत असते.घरच्या वेगवेगळ्या दायित्वाचे निर्वहन करीत असताना नानाविध समस्यांना तोंड द्यावे लागते. एकमेकांच्या सुखदुःखाची देवाणघेवाण केल्याने मनाचा हलकेपणा होतो.हिच बाब टिपून 'अनुगामी लोकराज्य महाअभियान' अंतर्गत महिला संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी महिलांना सामाजिक उपक्रमाची माहिती देण्यात आली. Information about social activities was given.प्रमुख मार्गदर्शक म्हणुन सेवा निवृत्त शिक्षीका राजूरा गानसम्राज्ञी सदावर्ते मॅडम,वाय.डी. कॉलेज राजूऱ्याच्या देशकर मॅडम,अनुगामी लोकराज्य महाअभियान राजूरा भागप्रमुख सतिश मुसळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
        प्रास्ताविकेत सतिश मुसळे यांनी शासनाच्या कल्याणकारी योजनांची Welfare Schemes of Govt माहिती देऊन याचा लाभ घ्या असे आवाहन केले.तर महिला सक्षमिकरणाबाबत Women Empowerment देशकर मॅडम यांनी मार्गदर्शन केले.महिलांनी जिवनचक्रात विविध दायित्वाचे पालन करित असतांना त्या दायित्वात सामंजस्य असाव तथा आपल्या लेकरांना संकारशिल बनविण्यासाठी तथा सात्विक गुण आत्मसात करण्यासाठी संस्कार देणे गरजेचे आहे.यासाठी परिसरात होणार संस्कार शिबीर Sanskar camp हे माध्यम आहे.लेकरांना संस्कारशिल बनवुन महिलांनी पुर्णतः सक्षम व्हा असे त्यांनी सांगितले.महिलांनी पेठ भागात अंगणवाडी केंद्र सुरू करणे संदर्भात अनुलोमकडे मागणी केली असता सतीश मुसळे यांनी माजी आमदार अॕड.संजय धोटे यांना ही बाब सुचविली असता लगेच वरिष्ठांशी संपर्क साधून ही मागणी पुर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
       यावेळी संगिता होकम,सारीका कोंडावार,रेखा मोहितकर,सविताताई रागिट,मंदाताई मोहितकर, मनीषा मोहितकर,अल्का भटारकर,मिनाक्षी रागीट, ईटनकर ताई,मायाताई काळे,वंदना वाटेकर,सुवर्णा काकडे,कुसुम देवाडकर,अर्चना वाटेकर,किरण मोहितकर यांच्यासह राजूरा येथील असंख्य महिलांची मोठ्यासंखेने उपस्थिती होती.संचालन नंदा वाटेकर, आभार संगीता होकर  यांनी व्यक्त केले.सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिसरातील मातृशक्तिंनी परिश्रम घेतले.
Anugami lokarajya maha abhiyan antargat mahila sanvad medava.
Women Empowerment.
Information about social activities was given.
                          -------//------
 मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.95959630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या