Subscribe Us

header ads

चंद्रकांत दादा पाटलांवरील 'शाईफेक' हल्ल्याचा भाजपाकडून निषेध.BJP condemns those attacking Chandrakant Dada Patil.

कोरपना:-@BJP
   राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री,भाजप नेते चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर 10 डिसेंबर रोजी काही समाजकंटकांनी 'शाईफेक' हल्ला केला.या हल्ल्याचा कोरपना भाजपा तालुक्याच्या वतीने निषेध करण्यात आला असून तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर यांच्या नेतृत्वाखालील 11 डिसेंबर रोजी कोरपना बस स्थानक चौकात जोरदार नारेबाजी करून त्या समाजकंटकांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. यावेळी भाजपा तालुका उपाध्यक्ष पुरुषोत्तम भोंगळे, माजी सरपंच नागोराव सिडाम,बुथ प्रमुख कार्तिक गोंडलावार,देविदास तुरंणकर,देविदास जरिले,सुरज दळांजे,सुरेन्द्र पावडे,सुरेश मडावी,सुधाकर कव्वलवार, दिवाकर गेडाम आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. पुन्हा असे हल्ले झाल्यास त्यांना त्यांच्या भाषेत धडा शिकवू.चंद्रकांत दादांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी खंबीरपणे उभी असून यानंतर असे कृत्य सहन केले जाणार नाही,असे परखड मत तालुकाध्यक्ष हिवरकर यांनी यावेळी व्यक्त केले.तसेच उपस्थित इतर मान्यवरांनी सुद्धा 'शाईफेक' हल्ल्याचा निषेध केला. यावेळी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती.
BJP condemns those attacking Chandrakant Dada Patail.
                         -------//-------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या