कोरपना:-@BJP...
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा JP Nadda यांची लोकसभा प्रवास योजनेंतर्गत 2 जानेवारी रोजी चंद्रपूर येथे होणार्या सभेच्या पार्श्वभूमीवर कोरपना भाजपच्या वतीने स्थानिक श्रीकृष्ण सभागृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले.अध्यक्षस्थानी चंद्रपूर भाजप अध्यात्मिक समन्वयक अघाडीचे राजकुमार पाठक होते तर कोरपना भाजपा तालुकाध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष नारायण हिवरकर यांनी उदघाटन केले.प्रमुख पाहुणे विशाल गज्जलवार,पुरूषोत्तम भोंगळे,किशोर बावणे, संजय मुसळे,अरुण मडावी,निलेश ताजने,अरविंद डोहे, नुतनकुमार जिवणे,आशिष ताजने,शशीकांत आडकिने,अमोल आसेकर,प्रदीप पींपळशेंडे,अनील कौरासे,हरिश घोरे आदींची उपस्थिती होती.

सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतीमेचे पुजन करण्यात आले तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मात्रोश्री स्व.हिराबेन मोदी यांना दोन मिनिट मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष पाठक यांनी जे.पी.नड्डा यांच्या सभेच्या नियोजनाची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.तर कोरपना तालुक्यातून सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष हिवरकर यांनी केले.इतर मान्यवरांनी सुद्धा याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.संजय चौधरी,ओम पवार, जगदीश पिंपळकर,नारायण कोल्हे,मनोज तुमराम, दिनेश खडसे,पद्माकर मडावी आदींनी सहकार्य केले. सदर बैठकीला तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती.संचालन पुरुषोत्तम भोंगळे तर आभार हरिश घोरे यांनी व्यक्त केले.
BJP National President JP Nadda's meeting in Chandrapur.
-------//-------
0 टिप्पण्या