नागपूर:-@training from priest.
राज्यातील IPS,IAS आणि IF पोलिस अधिकार्यांना देशातल्या नामांकित धर्मगुरूंकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे.केंद्र सरकारच्या संबंधित विभागाने राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाला यासंदर्भात आदेश सुद्धा दिले आहे.सर्वात महत्त्वाचा आणि धक्कादायक म्हणजे यात श्री सत्य साईबाबा,श्री श्री रविशंकर आदिंच्या संस्थेेचा समावेश आहे.केवळ याची घोषणाच नाही तर तारखाही जाहीर झाल्या आहे.7 दिवसााचे ऑफलाईन आणि 3 दिवसााचे ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाणार आहे.या प्रशिक्षणात कमीत कमी वेळात चांगले काम कसे करता येईल, कामाचे नियोजन कसे करावे,मनःशांती कशी राहील आणि लोकांच्या भावनेचा विचार करून पुढचे काम कसे करावे अशा व इतर गोष्टींचा मार्गदर्शन केला केले आहे.ऐन अधिवेशनाच्या वेळी सरकारचा हा निर्णय वादात येण्याची शक्यता जास्त निर्माण झाली आहे.
या प्रशिक्षणाचे वेळापत्रक पुढील प्रमाणे असणार आहे.सद्धरूंचं इशा योगा सेंटर 16 ते 20 जानेवारी ऑफलाईन प्रशिक्षण,श्री सत्य साई सेंट्रल ट्रस्ट 6 ते 10 फेब्रुवारी ऑफलाईन प्रशिक्षण देईल,द आर्ट ऑफ लिव्हिंग 15 ते 19 मे,ऑफलाइन प्रशिक्षण देईल,दाजी यांच्या हर्टफुलनेस संस्था 13 ते 15 मार्च ऑनलाइन प्रशिक्षण देईल.दरम्यान या प्रशिक्षणाचे वेळापत्रक जाणून घेतल्यनंतर सरकार IPS,IAS अधिकाऱ्यांना काय सांगू इच्छित आहे हा सवाल आता विरोधकांनी उपस्थित करायला सुरुवात केली आहे.
Chartered officers will receive training from priests.
-------//-------
0 टिप्पण्या