मुंबई:-@Minister Sudhir Mungantiwar.
राज्यातील अनुसुचित जमातीची वर्ग 1 ते 4 पर्यंतची विशेष पदभरती प्रक्रिया प्रलंबित असल्याने बेरोजगार आदिवासी उमेदवारांमध्ये असंतोष पसरलेला आहे.ही पदभरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी अशी मागणी वने व सांस्कृतीक कार्य,मत्स्य व्यवसाय,पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.येत्या 1महिन्यात ही प्रलंबित पदभरती प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने जाहीरात प्रसिध्द करण्यात येईल,असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.The pending special recruitment process of Scheduled Tribe category candidates should be completed expeditiously.
Deputy Chief Minister Devendra Fadnavis has assured that this pending recruitment process will be announced in 1 month.
अनुसुचित जमातीच्या उमेदवारांच्या प्रलंबित पद भरतीबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने शासनाशी पत्रव्यवहार व पाठपुरावा केला.10 मार्च 2022 रोजी सुधीर मुनगंटीवार यांनी या विषयासंदर्भात विधानसभेत अर्धा तास चर्चा उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले होते.अनुसुचित जमातीची वर्ग 1ते 4 पर्यंतची प्रलंबित विशेष पदभरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह इतर प्राधिकरणांनी जाहीराती देवून पूर्ण करण्याची आवश्यकता आहे.न्यायालयीन आदेशाप्रमाणे व 21 डिसेंबर 2019 च्या शासन निर्णयानुसार शासकीय तसेच खाजगी अनुदानित संस्थातील पदभरती प्रक्रिया पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. सर्वोच्च न्यायालयाने सिव्हील अपील क्रं.8929/2015 व इतर याचिकानुसार 6 जुलै 2017 रोजी दिलेल्या निर्णयाची राज्यात अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सामान्य प्रशासन विभागाने 21 डिसेंबर 2019 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.या शासन निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यामुळे अनुसुचित जमातीतील बेरोजगार उमेदवारांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यामुळे ही प्रलंबित पदभरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी सुधीर मुनगंटीवारांनी विधानसभेत केली होती.चर्चेदरम्यान तत्कालीन सामान्य प्रशासन राज्यमंत्र्यांनी कार्यवाहीचे आश्वासन देवूनही,ही पदभरती प्रक्रिया अद्यापही प्रलंबित आहे.आश्वासन पूर्तीसाठी सुधीर मुनगंटीवार यांनी तत्कालीन सामान्य प्रशासन राज्यमंत्र्यांना व तत्कालीन मुख्यमंत्र्यांना स्मरणपत्रे देखील पाठविली,मात्र तत्कालीन सरकारने कोणतीही कार्यवाही केली नाही.नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांचे याकडे लक्ष वेधले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1 महिन्यात याबाबत त्वरेने जाहीरात प्रसिद्ध करण्यात येईल,असे आश्वासन सुधीर मुनगंटीवार यांना दिले आहे.
The pending special recruitment process of Scheduled Tribe category candidates should be completed expeditiously.
Deputy Chief Minister Devendra Fadnavis has assured that this pending recruitment process will be announced in 1 month.
--------//-------
0 टिप्पण्या