Subscribe Us

header ads

आरोप..? वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे गेला चिमुकल्याचा बळी.Due to laxity of the forest department, the victim of a small child.

गडचांदूर:-@Forest Department...
        कोरपना तालुक्यातील बेलगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका 9 वर्षीय चिमुकल्याचा नाहक बळी गेल्याची दुर्दैवी घटना दोन दिवसापूर्वी घडली.कोरपना तालुक्यात मागील अंदाजे 1 महिनापासून वाघ, बिबट्याची दहशत पसरली असताना वनविभागाची कामगिरी संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे. वास्तविक पाहता वेळीच या बिबट्याला जेरबंद केले असते तर त्या चिमुकल्याचा जीव गेला नसता अशी खंत जनसामान्यांतून व्यक्त होत आहे.अखेर स्थानिक वनविभाग अधिकारी व कर्मचार्‍यांचे लक्ष आहे तरी कोणाकडे ? असे प्रश्न उपस्थित होत असून बालकाचा बळी स्थानिक वनविभाग अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच गेल्याचे थेट आरोप आता नागरिकांकडून होताना दिसत आहे. Vanavibhagachya halagarjipanamude gela cimukalyacha badi.
     हंगामाचे दिवस असल्याने रात्रंदिवस शेतकऱ्यांना विवीध कामानिमित्त शेतात जावे लागते.अगोदरच वन प्राण्यांमुळे शेतकर्‍यांचे उभे पिक नष्ट होत आहे.तर दुसरीकडे वाघ,बिबट्याची दहशत,यामुळे बळीराजा अक्षरशः हवालदिल झाला असून जीव मुठीत घेऊन शेतीची कामे करावी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.असे असताना मात्र स्थानिक वनविभाग केवळ वाघाला पकडण्याचा आव आणत असल्याचे आरोप त्रस्त नागरिकांकडून होत आहे.
           "चंद्रपूर जिल्ह्यात हल्ली वाघांचे हल्ले वाढले, सातत्याने होत असलेल्या वाघांच्या हल्ल्यात जाणारे बळी,अतिशय चिंतेची बाब असून या नरभक्षक वाघांना त्वरित जेरबंद करा अन्यथा निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल" असा थेट इशारा राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता.घ्या मग आता दोन दिवसापुर्वी कोरपना तालुक्यात बिबट्याने एका चिमुकल्याचा
बळी घेतला आहे,यावर वनमंत्री काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.! या वाघ-बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून काय उपाययोजना सुरू आहे,यासंदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना दूरध्वनीवरून संपर्क केला असता संपर्क झालेला नाही.
Vanavibhagachya halagarjipanamude gela cimukalyacha badi.
                         -------//-------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या