गडचांदूर:-@Flat sale case.
कोरपणा तालुक्यातील औद्योगिक नगरी नांदा येथे पी.एम.इन्फ्राव्हेंचरचा आवास प्रोजेक्ट 'यशोधन विहार' चे काम नांदा परिसरात युद्धपातळीवर सुरू आहे. प्रधानमंत्री आवास योजने Pradhan Mantri Awas Yojana अंतर्गत 'सर्वांसाठी घरे' यासाठी 1 हजार 50 फ्लॅटची निर्मिती व विक्री सुरू आहे.वन बीएचके One BHK फ्लॅटची किंमत 8 लाख,36 हजार 790 रूपये आहे. शासनाकडून 4 लाख,50 हजार रूपये अनुदान असल्याने वन बीएचके फ्लॅट फक्त 3 लाख,86 हजाराच्या जवळपास मिळणार असे जाहिरातीचे मोठमोठे फलक Advertising boards जिल्हा,शहरांसह गावागावात लागले आहे.महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून 2 लाख रुपयांचे अनुदान मिळण्यासाठी कुठलाही करारनामा नसताना पीएम इन्फ्राव्हेंचर कंपनी Infraventure Company अनुदान मिळणार असल्याची जाहिरात देऊन नागरिकांची फसवणूक करीत असल्याची तक्रार Complaint नांदा शहर काँग्रेस कमिटी कार्यकर्ते तथा मजी ग्रामपंचायत सदस्य अभय मुनोत यांनी थेट गडचांदूर पोलिस स्टेशनला दिली आहे.यामुळे चांगलीच खळबळ उडाली असून 'यशोधन विहार' प्रोजेक्ट Yashodhan Vihar' project मध्ये फ्लॅट खरेदी करताना नागरिकांनी फसवणूक टाळण्यासाठी संबंधित शासकीय कार्यालयातून यासंदर्भात सर्व शहानिशा करूनच फ्लॅट खरेदी करण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे.Fraudulent advertisements for sale of flats, Munot directly complained to the police.

सदर प्रकरणी मुनोत यांनी दिलेल्या तक्रारीवरून सविस्तर असे की,नांदा येथे श्रीवास्तव यांची जवळपास 51 एकर शेतीवर श्रीवास्तव यांच्या पी.एम. इन्फ्राव्हेंचर कंपनीकडून 1हजार 50 फ्लॅटची निर्मिती व विक्री सुरू आहे.नोडल एजन्सी म्हाडा,प्रधानमंत्री आवास योजना Nodal Agency MHADA, Pradhan Mantri Awas Yojana 'सर्वांसाठी घरे' पी.एम.वाय.योजनेतून 2 लाख 50 हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे.या व्यतिरिक्त महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडूनही 2 लाख अतिरिक्त अनुदान मिळणार असल्याचे मोठमोठे होर्डिंग ठिकठिकाणी लावण्यात आले आहे.8 लाखांची सदनिका 4 लाखांत मिळणार असल्याचा गाजावाजा जाहिरातीतून केल्याने 'यशोधन विहार' या आवासिय प्रकल्पात जिल्ह्यातील जवळपास 300 च्यावर नागरिकांनी फ्लॅट खरेदीसाठी बुकिंग केल्याचे सूत्रांकडून कळते ? एकाच फ्लॅट खरेदीसाठी शासनाकडून 2 योजनेचे 4 लाख रूपये अनुदान कसे काय मिळू शकते ? याबाबत अनेक शंकांना पेव फुटले असून अभय मुनोत यांनी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाला भेट देऊन विचारणा केली असता आयुक्त मंडळाकडून 2 लाख रूपये अनुदान देण्याबाबत केलेल्या जाहिरातीशी आमच्या कार्यालयाचा कुठलाही संबंध नाही,कोणत्याही इतर एजन्सीच्या माध्यमातून आम्ही अनुदानाचे वाटप करीत नाही अशी माहिती आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आल्याचे मुनोत यांनी म्हटले आहे.पी.एम. इन्फ्राव्हेंचर कंपनीकडून करण्यात येणारी जाहिरात फसवी असल्याचे आरोप करत मुनोत यांनी स्वतः हजर राहून तक्रार दिली आहे.यशोधन विहार प्रकल्पात फ्लॅट खरेदी करताना खरच 2 लाखांचे अनुदान मिळणार का ? फसवणूक तर होत नाही ना ? याबाबत नागरिकांनी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातून माहिती घेऊनच व्यवहार करण्याची गरज असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आवास योजनेच्या मंजूरीसाठी 2017-18 मध्ये एजंट agent मार्फत प्रधानमंत्री आवास योजनेचे फॉर्म भरून परिसरातील जवळपास 1 हजार नागरिकांचे आधार कार्ड जमा करण्यात आले होते.मंजूरी नंतर बिल्डर कंपनीकडून सरकारी प्रोजेक्ट असल्याचे सांगितले जात आहे.ज्या कुटुंबाच्या नावावर मंजूरी मिळाली,त्यांना डावलून फ्लॅटसाठी 4 लाख 50 हजार अनुदान मिळणार,अशी फसवी जाहिरात जिल्हाभरात सुरू असल्याने नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.लवकरच यशोधन विहार आवास प्रोजेक्ट मधील अनुदानाचा घोटाळा समोर आणणार आहे.
'अभय मुनोत'
माजी ग्रामपंचायत सदस्य,नांदा.
Soon Yashodhan Vihar will bring to light the subsidy scam in Awas Project."Abhay Munot''
--------//-------
सदर प्रकरणी यशोधन विहारच्या मॅनेजर सोबत दूरध्वनीवरून संपर्क साधन्याचा प्रयत्न झाला परंतु संपर्क होऊ शकला नाही.इच्छा असल्यास सदर विहारच्या जबाबदार व्यक्तींनी केव्हाही खालील दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करून स्पष्टीकरण द्यावे.
Fraudulent advertisements for sale of flats, Munot directly complained to the police.
Soon Yashodhan Vihar will bring to light the subsidy scam in Awas Project. 'Abhay Munot'
-------//-------
0 टिप्पण्या