चंद्रपूर:-@Swimming pool...
जिल्हा क्रीडा संकुल येथील जलतरण तलावाचे अत्याधुनिकीरण करण्यात यावे अशी मागणी माजी उपमहापौर राहूल पावडे यांनी 13 डिसेंबर रोजी एका निवेदनाद्वारे राज्याचे वने,सांस्कृतीक,मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांंच्याकडे केली होती.क्रीडाप्रेमींच्या आग्रहास्तव ही मागणी करण्यात येत असून ती पूर्ण झाल्यास याचा लाभ चंद्रपूरातीलच नाही तर अन्य जिल्ह्यातील क्रीडाप्रमींना होईल अशा आशावाद राहूल पावडे यांनी दिलेल्या निवेदनातून व्यक्त केला होता.याची सकारात्मक दखल घेत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलावाचे फिल्टरेशन प्लॅन्ट व विद्युतीकरण करणे,या कामासाठी 1 कोटी 57 लक्ष 15 हजार रू.निधी मंजूर करून दिली आहे.

सर्वसाधारण जिल्हा वार्षीक योजना सन 2022-23 अंतर्गत या कामाला 20 डिसेंबर 2022 रोजीच्या पत्रान्वये जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.जिल्हा क्रिडा संकुल येथील जलतरण तलावाबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी होत्या.यासंदर्भात चंद्रपूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर राहूल पावडे यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देत निधी मंजेरीसाठी सातत्याने पाठपुरावा केला.त्यांच्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले असून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने जलतरण तलावाचे फिल्टरेशन प्लॉन्ट व विद्युतीकरणाच्या कामासाठी निधी मंजूर करण्यात आल्यामुळे चंद्रपूर महानगरातील जलतरण पटूंची समस्या कायमची दूर होणार आहे.त्यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून माजी उपमहापौर राहूल पावडे यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे.
Fund sanctioned for swimming pool at District Stadium.
-------//-------
0 टिप्पण्या