Subscribe Us

header ads

गडचांदूर नगरपरिषदेचा कारभार ''जरा हटके'' Gadachandur Nagarprishdecha karbhar ''Zara Hatake''

गडचांदूर:-@N.P. Gadchandur...
कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी व प्रतिष्ठेची मानली जाणारी गडचांदूर नगरपरिषदेचा कारभार बघता याठिकाणी चालले तरी काय ! हे कळेनासे झाले आहे. ''काय ते सत्ताधारी,काय ते अधिकारी,सर्वच एकदम ओक्के'' अशी उपहासात्मक चर्चा शहरात ठिकठिकाणी ऐकायला नेहमीच मिळते.अशा नगरपरिषदे पेक्षा पुर्वीची ग्रामपंचायतच बरी होती,असे जळजळीत मत व्यक्त केले जात आहे.असे असताना आता वार्ड नंबर 6 येथील रहिवासी,कामगार नेते विजय ठाकरे यांनी "चंद्रपूर जिल्ह्यात पहिलीच नियोजनशुन्य न.प.म्हणजे गडचांदूर नगरपरिषद.?" असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे.Gadchandur Municipal Council is the first unplanned N.P. in Chandrapur district.
    गडचांदूर येथे दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत नळ पाईप लाईनचे काम नव्याने सुरू आहे.यापुर्वी सुध्दा अशाच प्रकारे अंदाजे 11 कोटी रुपयांच्या नळ पाईप लाईनची कामे करण्यात आली होती.त्या सर्व पैशांंचा चुराटा झाला.आता परत अंदाजे 1 कोटी 10 लाखांचा काम याठिकाणी होत आहे.परंतू या कामासाठी गेल्या अंदाजे 2 वर्षापूर्वी कोट्यावधी रूपये खर्च करून चांगले तयार केलेले काँक्रिट रस्ते फोडण्यात आले.जर जुन्या पाईप लाईनची टेस्टिंग झाली आणि ती चांगली असेल तर आता नवीन पाईप लाईन टाकण्याची गरज काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.तुम्ही जर नवीन पाईप लाईन टाकलीच तर जे बांधकाम तोडले ते कोण बनवणार ? काँक्रिट रस्ते तोडले,पेवरब्लॉक तोडले, WBM चे चांगले रस्ते तोडले,हे कोण बनवून देणार ? आता याच्यासाठी पुन्हा करोडो खर्च करणार की काय ? असा प्रश्न ठाकरे यांनी विचारला आहे.
यासंपुर्ण कामासाठी संबंधित ठेकेदाराला 6 महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता.ठेकेदार काम करून निघून जाण्याची वेळ सुद्धा आली ! तरी काम 'जैसे थे' पेंडींग पडलेले आहे.नाल्या बनवले बऱ्याच ठिकाणी त्यावर झाकण नाही.विकासाच्या नावाने निव्वळ याठिकाणी जनतेच्या पैशाची व्यवस्थितपणे वाट लावली जात असल्याचे आरोप करण्यात आले असून येथील नगरपरिषद इंजिनीअरच्या कामकाजाचे काहीही ताळतंब नाही,आणि त्यांची एवढी नियोजनशुन्यता आहे, ''चंद्रपूर जिल्ह्यात अधिकाऱ्यांच्या बाबतीत नियोजनशुन्य असलेली ही पहिलीच नगरपरिषद पहायला मिळत आहे'' अशी प्रशंसायुक्त टीका करत "शासनाचा पैसा घ्यायचा आणि उधळपट्टी करायची,आणि फक्त कमिशन खोरीसाठी एकच काम वारंवार करून करोडोंचा चुराटा करायचा" असा सनसनाटी आरोप विजय ठाकरे यांनी नगरपरिषदेवर केला आहे.हजारो पेवरब्लॉक काढुन ठेवले ते कोण आणि कधी लावणार ? यांच्या अशा भोंगळ कारभाराबद्दल ठेकेदार व विभागाच्या संबंधित अधिकाऱ्या विरोधात मुख्याधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे, मुख्यााधिकाऱ्यांनी स्वतः याठिकाणी येऊन पाहणी करून खात्री करून घ्यावी,आणि योग्य ती कारवाई करावी अन्यथा याविषयावर वरिष्ठांकडे दाद मागणार असल्याची माहिती विजय ठाकरेंनी 'कोरपना Live' सोबत बोलताना दिली आहे.
Gadachandur Nagarprishdeche karbhar ''Jara Hatake''
Gadchandur Municipal Council is the first unplanned N.P. in Chandrapur district.
                            -------//-------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या