Subscribe Us

header ads

गडचांदूर पोलीस एक्शन मोडवर. Gadchandur police on action mode.

गडचांदूर:-@Gadchandur police..
     गडचांदूर पोलीस 'ऐक्शन मोड' वर असून पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व अवैध व्यवसायीकांवर संक्रांत आल्याचे चित्र पहायला मिळत आहे.कारवाईची श्रृंखला सुरू असताना अवैधरीत्या गोवंश जनावरांच्या तस्करांना अटक करण्यात आली आहे. Gadchandur police on action mode.22 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास अवैधपणे गोवंश जनावरांची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती पोलीसांनी मिळताच गडचांदूर-बैलमपूर मार्गावर नाकाबंदी करून 1 आयशर टेम्पो मधून 7 व बोलेरो पिकअप मधून 4 बैल ताब्यात घेण्यात आले आहे. आयशर टेम्पो क्रं.MH 27 BX 5838,पिकअप क्रं. MH 34 BG 9726 व गोवंश बैल असा एकुण 16 लाख,10 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्हा नोंदवून प्रकाश रामकृष्ण हिवरे वयवर्ष 48 रा.चारगाव बुद्रुक ता.वरोरा,रमेश महादेव गजभिये वयवर्ष 54 रा.चारगाव बुद्रुक ता.वरोरा,इरफान गुफरान खान वयवर्ष 32 रा.वार्ड क्रं.4 गडचांदूर ता. कोरपना या 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
 जनावरांना तेलंगणा राज्यात घेऊन जात असल्याची कबुली आरोपींनी दिल्याचे कळते.सदर कारवाई पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी,अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधू,उपविभागिय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सत्यजित आमले,स.पो.नि.प्रमोद शिंदे,स.पो. नि.गोरक्षनाथ नागलोत,पो.हवा.प्रशांत येंडे,पो.शि. महेश चव्हाण,पो.शि.खंडूजी मुंडकर,पो.शी.व्यंटेश भटलाडे यांनी केली आहे.
 Gadchandur police on action mode.
16 lakh worth of goods seized along with 3 accused.
                         -------//-------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या