बीड जि.:-@WhatsApp messages.
व्हॉट्सअपवर येणारे सगळेच मॅसेज खरे असतात हे सांगणे सध्या कठीण होऊन बसले आहे.या मॅसेजवर कितपत विश्वास ठेवायचा हाच मोठा प्रश्न असून यासंदर्भात अनेक उदाहरणे समोर असताना बीड जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायत निकाला दरम्यान अशेच एक प्रकरण समोर आले आहे.केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील निकाल जाहीर होण्यापूर्वीच काही उत्साही कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमावर आपला सरपंच विजयी झाल्याची चुकीची पोस्ट टाकली.त्यामुळे इकडे गावात विजयाचा जल्लोष सुरू झाला.वाजत गाजत विजयी मिरवणूक निघाली.शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला.हा सारा आनंदोत्सव सुरू असतानाच आपला उमेदवार पराभूत झाल्याचा संदेश मिरवणूक चालू असतानाच धडकला. पराभूत झाल्यामुळे सर्वांचा अपेक्षाभंग झाला. Disappointing trust in WhatsApp messages.

सविस्तर असे की,2 दिवसापुर्वी महाराष्ट्रातील काही ठिकाणच्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले.याच पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकालाची मतमोजणी सुरू होती.यात चिंचोली माळी ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला उशीर होत असल्याने तेथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका उत्साही कार्यकर्त्याने राष्ट्रवादीची महिला 'सरपंच' म्हणून व यांच्यासह 9 उमेदवारही विजयी झाल्याची चुकीची पोस्ट व्हाॅट्सॲपवर टाकली.त्यामुळे अधिकृत निकाल जाहीर होण्यापूर्वीच गावात चक्क विजयी मिरवणूक काढून विजय जल्लोष सुरू झाला.सरपंच पतीवर व्हॉट्सॲपवरून अभिनंदनाचा वर्षावही सुरू झाला.ऐवढेच नाही तर शहराच्या लाईव्ह मीडियावाल्यांनीही त्यांना विजयी म्हणून जाहीर करून टाकले.असे असताना दुपारी 3.30 च्या सुमारास ग्रामपंचायतीचा अधिकृत निकाल जाहीर झाला.यावेळी सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपच्या महिला सरपंच म्हणून विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले आणि राष्ट्रवादीच्या त्या महिला त्यांचे पती आणि पॅनल प्रमुखांसह सर्वच कार्यकर्त्यांचा अपेक्षाभंग झाला.विजयाचे फटाके फुस्स झाले,ढोल ताशावाल्यांना गाशा गुंडाळायला लावला आणि मिरवणूक अर्ध्यातच आपटोपती घ्यावी लागली.यामागे व्हाॅट्सॲपवर केलेल्या तो चुकीच्या पोस्टमुळे मनस्तापसहन करावा लागला आणि जल्लोषात सुरू असलेली विजय मिरवणूक मधेच थांबवावी लागली.या सगळ्या घडामोडींना चुकीची पोस्ट कारणीभुत ठरल्याने व्हाॅट्सॲपवर येणारे सगळेच मॅसेज खरे असतीलच हे सांगणे अवघड होऊन बसले आहे. गैरसोय टाळण्यासाठी प्रत्येक पोस्टची व्यवस्थितपणे शहानिशा करूनच विश्वास ठेवलेलं कधीही बरं,असे मत यानिमित्ताने व्यक्त होत आहे.
How much to trust WhatsApp messages.
Disappointing trust in WhatsApp messages.
-------//-------
0 टिप्पण्या