Subscribe Us

header ads

बिबी येथील पत्रकाराचा पुण्यात सत्कार.!Journalist from Bibi felicitated in Pune.!

पुणे:-@Honoring the journalist.
  पुणे शहरात आयोजित 'जमियतुल मन्सुर पिंजारी, नदाफ समाज मेळाव्यात कोरपना तालुक्यातील जिल्हा स्मार्ट ग्राम बाबी येथील पत्रकार 'हबीब शेख' यांचा पिंजारी नदाफ समाजातर्फे पुष्पगुच्छ,शाल देवून सत्कार करण्यात आला.Bibi's journalist felicitated in Pune.ईमामे अब्बुहनिफा हॉल, साईबाबा नगर अक्षरधाम सोसायटी जवळ कोंटवा (खु.)पुणे येथे 5 डिसेंबर रोजी एक दिवसीय मन्सुरी, पिंजारी समाजाचा पश्चिम महाराष्ट्र विभागीय मेळावा पुणे शहर व जिल्हा कमिटीतर्फे आयोजित करण्यात आला.या मेळाव्यात महाराष्ट्रातील विवीध शहरातील पिंजारी समाज बांधवांनी मोठ्यासंख्येने हजेरी लावली होती.Jamiatul Mansoor Pinjari,Nadaf Community Gathering.
पिंजारी समाजातील काही लोकांकडे अजूनही पुरावे नसल्यामुळे जाती व वैधता प्रमाणपत्र बनविता येत नाही.परिणामी हा समाज शासनाच्या विवीध कल्याणकारी योजनांपासून वंचित असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.हा समाज इतर मागासवर्गीय प्रवर्गात मोडत असल्याने यांना जातीच व आवश्यक असलेले प्रमाणपत्र देण्यात यावे.याचबरोबर शैक्षणिक, आर्थिक प्रगती व समाजाच्या इतर मुद्यांवर सविस्तर विचार मंथन,मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आरीफ़ अली मंसूरी यांनी अध्यक्षस्थानावरून आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. उपस्थित मान्यवरांनी सुद्धा याप्रसंगी विवीध मुद्यांवर सखोल मार्गदर्शन केले
 यावेळी हाजी मिरा नद्दाफ,अब्दुल सत्तार,नगरसेवक हाजी फिरोज़ शेख,नगरसेवक हाजी गफूर पठाण, नगरसेवक रईस सुडके,हसीफ नद्दाफ,अब्दुल रहेमान पिंजारी,हाजी रोशन मन्सुरी,नीम मन्सुरी,सलीम नद्दाफ, बशीर मासूम,आरीफ रहेमान,तौसीफ रहेमान,पुणे जिल्हाध्यक्ष अनिस पिंजारी यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष, पदाधिकारी,मंसूरी पिंजारी नद्दाफ समाज बांधवांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती.यानिमित्ताने पिंजारी समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील पत्रकार म्हणून हबीब शेख बिबी(चंद्रपूर), फिरोज मन्सुरी लातूर,अॕड.ज़फर पिंजारी,रेल्वे अधिकारी अशपाक शेख तसेच समाजीक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.अशी माहिती देण्यात आली आहे.
Jamiatul Mansoor Pinjari,Nadaf Community Gathering.
Bibi's journalist felicitated in Pune.
                         -------//-------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630812.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या