गडचांदूर:-@Gadgebaba...
सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय गडचांदूर येथे 20 डिसेंबर रोजी कर्मयोगी संत 'गाडगेबाबा' यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मराज काळे होते.त्यांनी मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना गाडगेबाबांच्या कार्याबद्दल माहिती सांगितली.'तीर्थी धोंडा पाणी| देव रोकडा सज्जनी' हा आदर्श विद्यार्थ्यांनी अंगीकारावा.तसेच सर्व विद्यार्थ्यांनी शालेय परिसर,आपले घर व ग्राम स्वच्छतेचा मार्ग अवलंबून कर्मयोगी संत गाडगेबाबांना श्रद्धांजली अर्पण करूया. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पर्यवेक्षक संजय गाडगे,ज्येष्ठ शिक्षक महेद्रकुमार ताकसांडे,ज्योती चटप यांनी सुद्धा गाडगेबाबांच्या जीवन कार्यावर विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना दिली.संचालक नामदेव बावनकर तर आभार गजानन बोबडे यांनी व्यक्त केले.कार्यकमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश पाटील,बी.एस.मरसकोल्हे, श्रीमती सुषमा शेंडे,माधुरी उमरे,भुवनेश्वरी गोपमवार, सी.एम.किन्नाके,जीवन आडे,भालचंद्र कोगरे,आत्राम सर,मेश्राम सर,लिलाधर मत्ते यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
Karmayogi Gadge Maharaj yanna abhivadan.
-------//--------
0 टिप्पण्या