Subscribe Us

header ads

अनीस खान सलग दुसऱ्यांदा 'चंद्रपूर श्री'.Anis Khan 'Chandrapur Shree 2022' for the second time.

गडचांदूर:-@Chandrapur Shree 2022.
       कोरपना तालुक्यात औद्योगिक शहराच्या नावाने प्रसिद्ध गडचांदूर शहर,येथील अनीस खान या तरूणने शरीर सौष्ठव स्पर्धेत प्रथम येऊन सलग दुसऱ्यांदा 'चंद्रपूर श्री' चा खिताब पटकावला आहे.Anis Khan to win 'Chandrapur Shree 2022' for the second time.शरीर सुदृढ व आकर्षक असावे, यासाठी हल्ली प्रत्येक जण विवीध प्रकारच्या युक्त्या अवलंबतात.आखाड्यात पहिलवान मेहनत घेत शरीराला आकार देत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.असे असताना मात्र हल्लीच्या काळात शरीराला आकर्षक व पिळदार आकार देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान(जिम)ची जोड मिळाली असून तरूणांना यासाठी प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने विवीध ठिकाणी 'शरीर सौष्ठव' स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
        अनीस खान हा तरूण मागील अंदाजे 5 ते 6 वर्षांपासून शरीर कमवण्यासाठी मेहनत घेत आहे. परिणामी त्याला यामध्ये अप्रतिम यश मिळत असल्याचे या खिताब वरून सिद्ध होत आहे.गडचांदूर शहरातील आणि परिसरातील युवक आणि इतरही नागरिकांनी सदृढ आणि निरोगी जीवन जगण्यासाठी नियमित व्यायाम करावे यासाठी प्रेरित करीत असते.अनीस खान हा गडचांदूर येथे स्वतःचे जिम चालवत असून नुकताच चंद्रपूर येथे झालेल्या बॉडी बिल्डिंग असोसिएशन ऑफ चंद्रपूर यांच्या सौजन्याने आयोजित 'चंद्रपूर श्री' 2022 शरीर सौष्ठव स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवित सलग दुसर्‍यांदा या खिताबाचा मानकरी ठरल्याने खान यांनी गडचांदूर शहराचे नाव लौकिक केले आहे.मित्र परिवाराकडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत खान यांचे कौतुक केले जात आहे.
Anis Khan to win 'Chandrapur Shree 2022' for the second time.
                           --------//-------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या