गडचांदूर:-@Guptadhan.?
चंद्रपूर जिल्ह्यातील पश्चिमेकडील टोकावर असलेला अतिदुर्गम आदिवासी बहुल क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणार्या कोरपना शहर,या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या शहरात गुप्तधन शोधणारी टोळी सक्रिय झाल्याचे बोलले जात आहे.गेल्या आठवड्याभरा पुर्वी येथील वॉर्ड क्रमांक 8 मधील एका आदिवासी कुटुंबाच्या घरी गुप्तधन मिळाल्याची खमंग चर्चा सध्या शहरात ठिकठिकाणी ऐकायला मिळत आहे.येथील वॉर्ड क्रमांक 10 मधील एक व्यक्ती यामागचा मुख्य सुत्रधार असून गुप्तधन शोधण्यासाठी बल्लारपूर शहरातील एका मांत्रिकाला बोलविण्यात आले आणि त्या मांत्रिकाने आपल्या माध्यमातून गुप्तधनाचा शोध लावला.मात्र गुप्तधन मिळाल्यानंतर त्या बिचाऱ्या आदिवासी कुटुंबाला यांनी नाममात्र धन देऊन त्यातील मोठा हिस्सा घेऊन पोबारा केल्याचे बोलले जात आहे. कारवाईच्या भीतीने या आदिवासी कुटुंबाने 'तेरी भी चुप,मेरी भी चुप' अशी भूमिका घेतल्याचे कळते.सदर प्रकरणी सत्याता पडताळण्याची गरज असून स्थानिक पोलीस यापासून अनभिज्ञ असल्याचे दिसत आहे. Police need to find the truth.
गुप्तधन शोधणाऱ्या टोळ्या नेहमी एका विशिष्ट जातीचे सर्प,कासव,पायाळू व्यक्तीच्या शोधात राहतात.गुप्तधन शोधण्याच्या नादात अनेक ठिकाणी नरबळी सारखे गंभीर प्रकार सुध्दा घडल्याचे निदर्शनास आले आहे.कोरपना सारख्या शहरात मंत्रिकांना आणून गुप्तधन शोधणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याची चर्चा ऐकून सुज्ञ नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहे.गुप्तधनाच्या लालसेपोटी भविष्यात अशा टोळ्याकडून नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही,गंभीर घटना सुद्धा घडू शकते,असे मत व्यक्त होत असून पोलिसांनी आपली गुप्तचर यंत्रणा कामी लावून याप्रकरणी सखोल चौकशी करून सत्यता समोर आणावी,Police need to find the truth.खरच गुप्तधन शोधणारी टोळी सक्रिय असेल तर त्यांच्या मुसक्या आवळण्याची गरज असल्याचेही मत नागरिक व्यक्त करताना दिसत आहे.सत्यता जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेले नागरिकांचे लक्ष याकडे लागले आहे.

Korapana yethe Guptadhan shodhanari todi sakriy.?
Police need to find the truth.
--------//-------
0 टिप्पण्या