Subscribe Us

header ads

कोरपना येथे भाजपची बैठक संपन्न.Korpana BJP meeting concluded.

कोरपना:-@BJP
   कोरपना तालुका भाजपच्या वतीने विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले.अध्यक्षस्थानी लोकसभा विस्तारक चंद्रपूर खुशाल बोंडे होते तर भाजपा किसान आघाडी जिल्हाध्यक्ष राजू घरोटे, कोरपना तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर,उपाध्यक्ष पुरुषोत्तम भोंगळे,माजी सरपंच अरुण मडावी,माजी नगरसेवक अमोल आसेकर,माजी सरपंच विजय रणदिवे,दिनेश खडसे,प्रमोद कोडापे,मनोज तुमराम आदी मान्यवरांची प्रमुखपाहुणे म्हणून उपस्थिती होती.
        खुशाल बोंडे यांनी कोरपना तालुक्यातील 10 ग्रामपंचायत निवडणूकी संदर्भात चर्चा केली व 10 च्या 10 ग्रामपंचायती मध्ये भाजप बाजी मारेल असा विश्वास व्यक्त केला.तसेच माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांची ओबीसी आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली,3 डिसेंबर रोजी दिल्ली येथून त्यांचे चंद्रपूर येथे आगमन होत असून स्थानिक गांधी चौक येथे सायंकाळी 6 वाजता सभेचे आयोजन करण्यात आले आहे.सभेला भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्यासंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन खुशाल बोंडे यांनी यावेळी केले.बैठकीत इतर विषयांवर सुद्धा चर्चा झाली.मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. संचालन नारायण हिवरकर तर आभार पुरुषोत्तम भोंगळे यांनी व्यक्त केले.
Korpana BJP meeting concluded.
                           -------//-------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या