रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे,महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही,शिवरायांचा जन्म हा शिवनेरीवर झाला हे लहान मुलांना सुध्दा माहीत आहे, मात्र भाजप नेते आ.प्रसाद लाड यांनी 'स्वराज्यभुमी कोकण' या कार्यक्रमात शिवरायांचा जन्म हा कोकणात झाल्याचे वक्तव्य केले.लाड यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे अगोदरच सुरू असलेल्या वादाला पुन्हा एकदा नव्याने तोंड फुटले आहे.हे ऐकून एकीकडे इतिहासाचे जाणकारांनी डोक्यावर हात ठेवले तर दुसरीकडे महाराष्ट्रात ठिकठिकाणी संतापाची लाट उसळल्याचे चित्र आहे.दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे समृध्दी महामार्गाची पाहणी करण्यासाठी नागपूरात आले असताना पत्रकारांनी याविषयी विचारले तेव्हा ते पत्रकारांसोबत संवाद साधताना म्हणाले की, 'शिवरायांचा जन्म शिवनेरीवरच झाला,शिवराय सर्वांचे दैवत आहे,त्यांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही' अशी प्रतिक्रिया दिली.तसेच ज्या गतीने समृध्दी महामार्गाचे काम झाले,त्याच गतीने महाराष्ट्राचे सरकार काम करीत आहे' असेही मुख्यमंत्री म्हणाले.

---------//---------
(आ.लाड यांनी केली दिलगिरी व्यक्त.)
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस ज्यापद्धतीने राजकारण करते त्याचा मी निषेध करतो, ज्या भावनेतून जो कार्यक्रम आम्ही केला आहे,त्यामध्ये मी स्पष्टपणे म्हटलं होतं,आणि माझी चुकही सुधारली होती,व्हिडीओ पाहिला तर लक्षात येईल की,त्यामध्ये शिवाजी महाराजांची कर्मभूमी,स्वराज्याची स्थापना कोकणातून झाली आणि जन्म शिवनेरीवर झालं असा माझ्या बाजूला बसलेल्या संजय यादवनी सुद्धा म्हटलं आणि ते देखील मिडियामध्ये आलेला आहे,परंतु तरी देखील छत्रपतींचा नाव घेऊन राजकारण करण्याचा काम राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने करतं त्याचा मी निषेध करतो,आणि माझ्या शब्दांमुळे कोणाचे भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो.

Lad said 'Chhatrapati Shivaji Maharaj was born in Konkan'!
-------//-------
0 टिप्पण्या