Subscribe Us

header ads

महाराष्ट्र राज्य पोलिस पाटील श्रमिक संघटनेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी मारोती राऊत. Maroti Raut as Chandrapur District President of Maharashtra State Police Patil Labor Association.

गडचांदूर:-@Police Patil. 
  महाराष्ट्र राज्य पोलिस पाटील श्रमिक संघटना राज्य कार्यकारणीची सभा यवतमाळ येथे नुकतीच पार पडली.अध्यक्षस्थानी राज्य अध्यक्ष गंगाधर उगे होते तर राज्य सचिव हरिदास घोरपडे यांची प्रमुखाने उपस्थिती होती.या सभेत कोरपना तालुक्यातील ''कवठाळा" येथील "मारोती प्रभु राऊत'' या पोलिस पाटलाची चंद्रपूर जिल्हाध्यक्ष म्हणून सर्वांनुमते निवड करण्यात आली.सदर नियुक्तीचा कार्यकाळ तीन वर्षाचा असून या संघटनेच्या माध्यमातून पोलीस पाटलाच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी प्रयत्न केले जाणार आहे. Maroti Raut as Chandrapur District President of Maharashtra State Police Patil Labor Association.
       मारोती राऊत हे गेल्या 6 वर्षांपासून कवठाळाचे पोलिस पाटील असून त्यांनी गावाच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे.महात्मा गांधी तंटामुक्त अभियान,गुरूदेव सेवा मंडळाच्या कार्यात ते नेहमी पुढाकार घेतात.कोरोना महामारीत त्यांनी केलेल्या विशेष कामगिरीचे कौतुक शासन स्तरावर झाले आहे. ते राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे कार्यकारणी सदस्य असून अनेक सेवा कार्यात ते आघाडीवर असतात.शासन मान्यता प्राप्त सार्वजनिक ग्रंथालय संघाचे ते जिल्हा सचिव पण आहे.त्यांच्या या निवडीबद्दल पोलिस पाटील साईनाथ मांदाडे एकोडी, प्रमोद देरकर बोरगाव,देवानंद ठाकरे गाडेगाव,संजय मडावी शिरूर,पुरुषोत्तम गावंडे भोयगाव,सुनील आत्राम जैतापूर,बिभीषण कुमरे पालगाव,तुकाराम जाधव लिंगनडोह,उषा गेडाम बेलगाव,योगिता टिपले हिरापूर तसेच जिल्ह्यातील इतर पोलिस पाटलांनीही मारोती राऊत यांचे अभिनंदन केले आहे.आपल्या न्याय मागण्या मंजूर करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलिस पाटलांनी संपर्क करावा तसेच तालुकास्तरावर समित्या गठीत कराव्यात,असे आवाहन नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष मारोती राऊत यांनी केले आहे.
Maroti Raut as Chandrapur District President of Maharashtra State Police Patil Labor Association.
                          -------//-------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या