Subscribe Us

header ads

मॉर्निंग वॉक' बेतलं जीवावर. Morning walk...

सिंदेवाही:-@Bear attack.
       मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका व्यक्तीवर अस्वलाने अचानकपणे हल्ला केल्याची घटना 15 डिसेंबर रोजी सकाळी अंदाजे 6 च्या सुमारास सिंदेवाही शहरा जवळील रेल्वेस्टेशन समोर ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटर रोडवर घडली.A person who went for a morning walk was attacked by a bear
नंदू शेंडे वय अंदाजे 50,असे हल्ला झालेल्या जखमी इसमाचे नाव असल्याची माहिती असून ते सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेले असता अचानक अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला.या हल्ल्यात त्यांच्या दोन्ही डोळे,नाक आणि डाव्या कुशीत गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे हलवण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी आपल्या चमूसह घटनास्थळी पोहोचले.पंचनामा करण्यात आला असून वनपरिक्षेत्र अधिकारी सालकर यांच्या नेतृत्वात पुढील तपास सुरू आहे.
A person who went for a morning walk was attacked by a bear...!
                         --------//--------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या