Subscribe Us

header ads

खा.बाळू धानोरकर भेटले केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना.MP Balu Dhanorkar met Railway Minister.

चंद्रपूर:-@MP Balu Dhanorkar.
   चंद्रपूर,वणी,आर्णी लोकसभा मतदारसंघात रेल्वे संदर्भातील विवीध समस्यांना घेऊन काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली.नवी दिल्लीत झालेल्या या भेटी दरम्यान त्यांनी चंद्रपूर,यवतमाळ व गडचिरोली जिल्ह्यातील रेल्वेच्या संदर्भातील विवीध समस्यांचे निवेदन त्यांना दिले.यावेळी रेल्वे विषयक विवीध समस्यांसाठी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत समस्या त्वरित मार्गी काढण्याचे आश्वासन खा.धानोरकर यांना दिले.Congress MP Balu Dhanorkar met Railway Minister Ashwini Vaishnav.
चंद्रपूर लोकसभा क्षेत्राला लागून तेलंगणा राज्याची सीमा आहे.या भागात राजूरा,गडचांदूर क्षेत्र मागील अनेक दिवसांपासून समस्यांनी ग्रस्त आहे.सत्तावीस वर्षांपूर्वी तालुक्यातील अल्ट्राटेक,माणिकगड,अंबुजा सिमेंट उद्योगांसाठी दिल्ली,चेन्नई रेल्वे मार्गवर चुनाळा, राजूरा,अवळपूर पर्यंत रेल्वे लाईन निर्माण झाली होती. त्या मार्गावर केवळ कोळसा आणि सिमेंटची वाहतूक करण्यात येते.या मार्गावर प्रवासी सेवा सुरू करण्याची मागणी मागील कित्येक वर्षांपासून सुरू आहे.मात्र ती मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही.याकडे देखील खा. बाळू धानोरकर यांनी लक्ष वेधले.बल्लारपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे सुविधा आहे.मात्र 50 ते 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या या खेडेगाव आणि औद्योगिक क्षेत्रातील नागरिकांना पायपीट करावी लागते.गडचांदूर रेल्वे स्थानक व मार्ग कर्मचारी उपलब्ध आहे.गडचांदूर,आदीलाबाद रेल्वे मार्ग प्रस्तावित आहे.गडचांदूर ते चुनाळा रेल्वे सुरू करण्यासाठी कारवाई करण्याची मागणी यावेळी खा. धानोरकरांनी केली.
   या निवेदनात काझीपेठ,पुणे एक्स्प्रेस आठवड्यातून 3 दिवस सुरू करणे.बल्लारपूर,भुसावळ सेवाग्राम लिंक एक्स्प्रेस(51196)पुर्ववत सुरू करणे.नागपूर, मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस,बल्लारपूर-जबलपूर व्हाया नागभीड इंटरसिटी एक्सप्रेस,बल्लारपूर-मूल-नागभीड-ब्रम्हपुरी-गोंदिया रेल्वे मार्गावरील अंडरपास पावसाळ्यात शेतकऱ्यांना आवागमन करण्यास त्रासदायक ठरतात.त्याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करणे.राजुरा-असिफाबाद- हैद्राबाद मार्गावर रेल्वे गेट नं.LC No3.0H व विरूर स्टेशन महाराष्ट्र पोल नं.159/17 जवळ अंडरपास तयार करणे.गडचांदूर-चुनाळा वरून नागपूर शटल रेल्वे सुरू करणे.भांदक रेल्वे स्टेशन वर दक्षिण एक्सप्रेस ट्रेन नं.12721/12722.मद्रास जम्मुतवी एक्सप्रेस ट्रेन नं.16031/16032.मद्रास लखनौ एक्सप्रेस ट्रेन नं.18093/16094.मद्रास जोधपूर एक्सप्रेस ट्रेन नं.22663/22664.दानापूर,सिकंदराबाद एक्सप्रेस ट्रेन नं.12791/12792.पेरणाकुलम,पटणा एक्सप्रेस ट्रेन नं.16359.नवजीवन एक्सप्रेस ट्रेन नं.12656/ 12657.अँड ट्रक एक्सप्रेस ट्रेन नं.12615/12616. हिसार एक्सप्रेस ट्रेन नं.22737 या गाड्यांना स्टॉपेज देणे. 
       महाराष्ट्र राज्यातील विदर्भ क्षेत्रात येणारा चंद्रपूर-गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहूल आहे.नक्षल प्रभावित असल्याने विकासाची कामे पाहिजे, त्याप्रमाणात होऊ शकत नाही.येथे राज्य परिवहन मंडळाची बस चालते मात्र,राज्य परिवहन मंडळ नेहमीच तोट्यात असतो.ग्रामीण आणि शहरी भागातील सुविधा सुरू करण्यासाठी गो राऊंड ट्रेन मध्य रेल्वेने बल्लारपूर स्टेशन येथून सुरू करून चंद्रपूर,भद्रावती,वरोरा,हिंगणघाट,सेवाग्राम,नागपूर, भंडारा,गोंदिया,वडसा,ब्रह्मपुरी,नागभीड,सिंदेवाही,मूल,चंद्रपूर,बल्लारशा अशी ट्रेन सुरू करण्याची मागणी खा.धानोरकरांनी केली.दक्षिण पूर्व मध्य रेल्वेद्वारा जबलपूर ते चंद्रपूर नवीन गाडी सुरू झाली आहे.ही गाडी चंद्रपूर ऐवजी बल्लारपूर पर्यंत(02274-02273)सुरू झाल्यास बल्लारपूर,राजूरा,गडचांदूर येथील प्रवाशांना लाभ होऊ शकतो.त्यामुळे महसुलात देखील मोठी वाढ होऊ शकते.अंबुजा,अल्ट्राटेक, माणिकगड आदी उद्योग येथे मोठ्याप्रमाणात आहे.ही गाडी सौंदळ,अर्जुनी,वडसा,नागभीड,मूल आणि मारोडा या स्थानकावर थांबल्यास अनेक प्रवाशांना त्याचा लाभ होऊ शकतो.याकडेही खा.धानोरकरांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.
Congress MP Balu Dhanorkar met Railway Minister Ashwini Vaishnav.
                         --------//--------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या