Subscribe Us

header ads

हृदयाचा बंद व्हॉल्व उघडून नवजात बाळाचे वाचविले प्राण. A newborn baby's life was saved by opening a closed heart valve.

नागपूर:-@A very rare case.
     मातृसेवा संघ नागपूर येथे जन्म घेतलेल्या एका 2 दिवसाची नवजात गोंडस मुलीला जन्मत: ऑक्सिजनचे प्रमाण 70,80 टक्के होते.ही गंभीर बाब लक्षात घेऊन बाळाला लगेच ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला.तरीसुद्धा ऑक्सिजनचे प्रमाण गरजेपेक्षा कमीच होते.2 दिवस उपचार करूनही त्याची परिस्थिती गंभीरच होती.उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी नागपूरातील हिंगणा रोड वरील लता मंगेशकर हॉस्पीटलच्या डॉक्टरांशी संपर्क साधला असता बाळाला ताबडतोब पाठवा,असे तेथील डॉक्टरांनी सुचवले.बाळ पोहोचेपर्यंत डॉक्टरांनी उपचाराची सर्व तयारी करून ठेवली होती.गंभीर अवस्थेत बाळ पोहोचताच ताबडतोब आयसीयू ICU मध्ये भरती करून व्हेंटीलेटर लावण्यात आले. अत्यावश्यक निदान चाचण्या करण्यात आल्या.
रुग्णालयाचे निष्णात हृदयरोग विशेषज्ञ डॉ.हितेंद्र भागवतकर यांनी त्यांच्यापरीने काही चाचण्या केल्या. त्यात त्यांचे लक्षात आले की,जन्मत: बाळाच्या हृदयाचा एक व्हॉल्व बंद आहे.त्यामुळे रक्ताभिसरण आणि ऑक्सिजन पुरवढा बरोबर होत नाही आहे. अवघ्या 2 दिवसाच्या बाळाची ही अत्यंत दुर्मिळ केस A very rare case असल्याने ताबडतोब निर्णय घेऊन शस्त्रक्रिया करण्याची गरज होती.परंतू,2 दिवसाच्या बाळाची शस्त्रक्रिया करणे अत्यंत जोखमीचे,असे डॉ.भागवतकरांचे मत होते.त्यांनी स्वतःच जोखीम पत्करून शस्त्रक्रिया न करता आपात्कालीन परिस्थितीत बाळाच्या पायामार्गे एक दुर्मिळ प्रोसिजर केली आणि बंद असलेला व्हॉल्व मोकळा केला.त्यानंतर हृदयाला होणारा रक्त पुरवठा आणि ऑक्सिजन पुरवठा सुरळीत सुरू करण्यात यश आले.बाळाचे ऑक्सिजनचे प्रमाण 100 टक्के असून बाळ तंदुरूस्त आहे.पालकांनी आनंद व्यक्त करून लता मंगेशकर हॉस्पीच्या डॉक्टर व चमूचे आभार मानले आहे.
          या उपचारात सुप्रसिध्द हृदयरोग तज्ञ डॉ.हितेंद्र भागवतकर(हृदयरोग विभाग प्रमुख,लता मंगेशकर हॉस्पीटल)यांच्या मार्गदर्शनात डॉ.मनीष चोखान्दरे (बाल-हृदयरोग तज्ञ),डॉ.रोशन(हृदयरोग बधिरीकरण तज्ञ)यांनी ही उत्कृष्ट कामगिरी बजावली.डॉ.गिरीश नानोटी(बालरोग विभाग प्रमुख)आणि चमूने नवजात/बाल आयसीयूमध्ये व्हेंटीलेटरवरील बाळावर काळजीपूर्वक उपचार केले.2 दिवसाच्या लहान बाळाचे हे अत्यंत दुर्मिळ प्रकरण अत्यंत आधुनिक पद्धतीने Modern methods उपचार करून हाताळण्यात लता मंगेशकर हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी यश मिळविले.विदर्भातील हे पहिलेच मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय आहे,ज्यांनी असे प्रकरण चांगल्या पद्धतीने हाताळले आणि बाळाचे प्राण वाचविले. भविष्यातसुद्धा रुग्णालयाचे अत्याधुनिक हृदयरोग व कॅथलॅब विभाग गरजू रुग्णांसाठी वरदान ठरेल,अशी प्रतिक्रिया एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालय व लता मंगेशकर हॉस्पीटलचे अधिष्ठाता डॉ.काजल मित्रा यांनी व्यक्त करून डॉक्टर चमूचे अभिनंदन केले आहे.
A very rare case....!
A newborn baby's life was saved by opening a closed heart valve.
                         --------//-------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9595608311,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या