Subscribe Us

header ads

पत्नीच्या कारणावरून भर चौकात चाकू हल्ला,युवक गंभीर जखमी.Patnichya Karnavarun Bhar Caukat Caku Halla, Yuvak Gambhir Jakhami...

गडचांदूर:-@Knife Attack..
     कोरपना तालुक्यातील औद्योगिक शहर गडचांदूर येथील महात्मा गांधी शाळे समोर गजबजलेल्या अशा ठिकाणी दुपारी अंदाजे 3 च्या सुमारास एका इसमाने दुसऱ्यावर चाकूने हल्ला करून गंभीररीत्या जखमी केल्याची घटना 26 डिसेंबर रोजी घडली.
       दिनेश महादेव काळे वयवर्ष 36 रा.बिबी असे जखमीचे नाव तर भास्कर नारायण कांबळे वयवर्ष 46 रा.इंदिरानगर वार्ड क्रमांक 6 गडचांदूर असे आरोपीचे नाव आहे.पत्नीच्या कारणावरून आरोपीने त्याला ठार मारण्याच्या प्रयत्नात हा चाकू हल्ला केल्याचे कळते. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार सत्यजित आमले यांनी विलंब न लावता पोलीसांसह घटनास्थळी धाव घेतली.दरम्यान जखमी युवकाला त्वरित ग्रामीण रुग्णालय येथे भरती करण्यात आले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे पाठवले आहे.या हल्ल्यात युवक गंभीररीत्या जखमी झाला पण,सध्या प्रकृती धोक्याबाहेर आहे.गडचांदूर पोलीसांनी कलम 307 भा.द.वि.अन्वये गुन्ह्याची नोंद करून आरोपीला अटक केली पुढील तपास सुरू आहे. ''पती,पत्नी और वह'' यामागचे कारण तर नसेल ना,अशी शंकायुक्त चर्चा सध्या शहरात ठिकठिकाणी ऐकायला मिळत आहे.?  
Patnichya Karnavarun Bhar Caukat Caku Halla,Yuvak Gambhir Jakhami...
                        -------//-------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या