Subscribe Us

header ads

पंतप्रधानांच्या हस्ते होणार मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे उद्घाटन.The Prime Minister will inaugurate the Mumbai-Nagpur Samriddhi Highway

मुंबई:-@Samriddhi Highway.
     महाराष्ट्र सरकारने उभारलेला देशातील सर्वाधिक लांबीचा आणि वेगवान असा ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग’ महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा ठरणार असून राज्याच्या सर्वांगीण विकासात मोठे योगदान राहील, Development of the state is accelerated by the Samriddhi Highway.असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.11डिसेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे उद्घाटन होणार आहे.पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमांच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठकीत घेतला.केंद्रीय मंत्रिमंडळाने नागपूर मेट्रो टप्पा दोन आणि नाग नदीप्रदुषण नियंत्रण प्रकल्पाला मंजूरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.समृद्धी महामार्गामुळे विदर्भ,मराठवाड्यासह राज्याच्या अन्य भागात औद्योगिक क्रांती होईल,असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.या बैठकीत मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली.नागपूर विमानतळावर पंतप्रधानांचे आगमन झाल्यावर खापरी मेट्रो स्थानक येथे पहिल्या टप्प्याचे उद्घाटन,वंदे मातरम रेल्वे गाडीला हिरवा झेंडा,मिहान एम्सचे लोकार्पण हे कार्यक्रम होतील.पहिल्या टप्प्यात नागपूर ते शिर्डी 701 कि.मी. पैकी 520 कि.मी.मार्गाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.पंतप्रधानांच्या नागपूर दौऱ्यात विविध कार्यक्रम होणार असून ते समृद्धी महामार्गावरून आणि नागपूर मेट्रो रेल्वेतून प्रवासही करणार आहे. वायफळ टोल नाका येथे समृद्धी महामार्गाचे उद्घाटन होईल.नंतर मोदी झीरो माइल्स ते वायफळ टोलनाका असा प्रवास करतील.टेम्पल मैदानावर पंतप्रधानांची सभा होणार आहे.यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,अश्विनी वैष्णव,हरदीप पुरी,केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार,रावसाहेब दानवे आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे कळते.
The Prime Minister will inaugurate the Mumbai-Nagpur Samriddhi Highway.
Development of the state is accelerated by the Samriddhi Highway.
                        --------//-------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या