Subscribe Us

header ads

समृध्‍दी महा‍मार्ग.! Samriddhi Highway.

नागपूर:-@Samriddhi Highway...
             हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्‍दी महा‍मार्गाचा विस्‍तार चंद्रपूर-राजुरा पर्यंत करण्‍याची मागणी चंद्रपूर जिल्‍ह्याचे पालकमंत्री तथा वने, सांस्‍कृतीक कार्य व मत्‍स्‍य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.ही मागणी मान्‍य करत मुख्‍यमंत्र्यांनी पुढील कार्यवाही तातडीने करण्‍याचे निर्देश संबंधितांना दिले.Minister's directives to take swift action by providing quick funds.पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 23 डिसेंबर रोजी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत निवेदन सादर करून यासंदर्भात चर्चा केली.
          चंद्रपूर जिल्‍हा हा आदिवासी बहुल,वनव्‍याप्‍त जिल्‍हा असून ताडोबा सारख्या राष्‍ट्रीय उद्यानाला देशविदेशातून पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात.हा जिल्‍हा विवीध खनिजांनी समृद्ध असून जिल्‍ह्याची अर्थव्यवस्‍था विद्युत निर्मीती,खनिज उद्योग व सिमेंट उद्योगा भोवती केंद्रीत आहे.त्‍यामुळे राज्‍याच्‍या या भागातील वाहनांना देखील समृध्‍दी महामार्गाद्वारे मुंबईसाठी सर्वात कमी अंतराची तसेच जलदगती महामार्गाची सुविधा उपलब्‍ध होवू शकेल.यासंदर्भात 6 जुलै 2022 रोजी भेट घेऊन मुनगंटीवार यांनी निवेदन दिले होते.त्‍यामुळे आपण दिलेल्‍या निर्देशानुसार प्रस्‍ताव सुध्‍दा पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्‍यात आला.29 सप्‍टेंबर 2022 रोजीच्‍या पत्रान्‍वये नागपूर मुंबई सुपर कम्‍युनिकेशन एक्‍सप्रेसवे लिमीटेड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र पाठवून समृध्‍दी महामार्गाचा नागपूर ते चंद्रपूर-राजूरापर्यंत विस्‍तार करण्‍यासाठी सविस्‍तर प्रकल्‍प अहवाल तयार करण्‍यासाठी व भूसंपादन करण्यासाठी अंदाजे 20 कोटी रू.निधी महाराष्‍ट्र राज्‍य रस्‍ते विकास महामंडळाला उपलब्‍ध करून देण्‍याची विनंती केली होती.अद्यापही त्यांच्‍या सदर विनंतीला मान्‍यता मिळालेली नाही.याबाबत मुख्‍यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून या अहवालाला मान्‍यता देण्‍याचे निर्देश द्यावे, अशी विनंती पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्र्यांकडे केली आहे.Chief Minister's directives to take swift action by providing quick funds.याबाबतच्‍या अहवालाला त्‍वरीत मान्‍यता देण्‍यात यावी व निधी उपलब्‍ध करण्‍याबाबत सुध्‍दा त्‍वरीत कार्यवाही करावी व पुढील कार्यवाही जलदगतीने करण्‍याचे निर्देश मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला तात्‍काळ दिले.पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहे.
Samriddhi Highway should be extended to Chandrapur-Rajura.
Chief Minister's directives to take swift action by providing quick funds.
                              -------//-------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या