Subscribe Us

header ads

कोरपना तालुक्यात अवैध व्यवसायीकांवर संक्रांत. Sankrant on illegal traders in Korpana taluka.

कोरपना:-@On police action mode.
 कोपरना तालुक्यात अवैध दारूविक्री,सुगंधित तंबाखू विक्री,सट्टापट्टी,झंडीमुंडी,अवैध कोळसा तस्करी अशा विवीध प्रकारच्या अवैध धंद्यांना कमालीचा ऊत आला होता.पोलिसांच्या कारवाया सुरू असतानाही यावर अपेक्षेप्रमाणे अंकुश बसत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांकडून रोष व्यक्त होत होता.असे असताना आता उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक हे एक्शन मोडवर On Action mode.असून गेल्या आठवड्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई करून लाखोंचा माल जप्त केला. तसेच दोन दिवसांपूर्वी गडचांदूर-भोयगाव मार्गावरील एका कोळशाच्या अवैध साठ्यावर धाड टाकून लाखोंचा अवैध कोळसा नायक S.D.P.O.Sushil Kumar Nayak यांनी जप्त केला आहे.
     याच श्रेणीत कोरपना येथील अवैध दारुविक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे.ठिकठिकाणी अवैध धंद्यांवर धाड सत्राची मालिका सुरू असताना कोरपना पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरील एका शेत शिवारात एक पत्रकार बिनधास्तपणे सट्टापट्टी चालवत होता.याची माहिती कोरपनाचे ठाणेदार सदाशिव ढाकणे यांना मिळताच त्यांनी पोलिस कर्मचार्‍यांसह धाड टाकून सुधाकर,देवराव,राजेश या आरोपींना अटक करून मोबाईलसह इतर मुद्देमाल व जवळपास 41 हजार 600 रूपये रोख जप्त केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.गुन्ह्याची नोंद करून कायदेशीर कारवाई करण्यात आली असून यातील फरार आरोपींचा पोलिस शोध घेत आहे. Sankrant on illegal traders in Korpana taluka
'पत्रकारीता मला शिकवू नका,तुमच्या सारखे पत्रकार लई पाहिले,माझी सर्व सेटिंग आहे' या अविर्भावात, मोठ्या रुबाबाने कोरपना वासीयांच्या नाकावर टिच्चून गेल्या कित्येक वर्षांपासून कोरपना पोलिस स्टेशन हद्दीत बिनधास्तपणे सट्टापट्टी,झंडीमुंडी,जुगार असे धंदे चालवत असलेल्या ठिकाणी उशिरा का होईना अखेर पोलिसांनी धाड टाकली.कोरपना येथे सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर अंकुश लावण्यासाठी नागरिकांनी कित्येकदा खालपासून तर वरपर्यंत लेखी तक्रारी केल्या मात्र याविषयी सकारात्मक काहीच घडत नव्हते.आता मात्र उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात ठिकठिकाणी विवीध अवैध धंद्यांवर धाड सत्र सुरू असल्याने अवैध व्यावसाईकांचे धाबे दणाणले आहे.काही अपवाद वगळता सध्याच्या परिस्थितीत तालुक्यात शांततेचे वातावरण पहायला मिळत असून पोलिस प्रशासनाचे कौतुक केले जात आहे.मात्र ही शांतता किती काळ टिकेल ? हे पाहणे औचित्यचे ठरणार आहे.
On police action mode.
Sankrant on illegal traders in Korpana taluka.
                          -------//-------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या