Subscribe Us

header ads

कोरपना येथे श्री केतेय्या स्वामी जयंती साजरी.Shri Keteiya Swami Jayanti celebrated at Korpana.

कोरपना:-@Keteiya Swami Jayanti.
      बुरुड समाजाचे आराध्य दैवत,महान तपस्वी श्री केतेय्या स्वामी(केतेश्वर महाराज)यांची जयंती 10 डिसेंबर रोजी कोरपना येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते केतेय्या स्वामी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यानिमित्ताने बुरुड समाज भवन पासून पालखी यात्रा काढण्यात आली. शहरातील मुख्य मार्गाने भ्रमण करीत यात्रेचे समारोप समाज भवन येथे झाले.याठिकाणी एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूर जिल्हा बुरुड समाज संघटन सचिव तथा गडचांदूर ग्रा.पं.चे माजी सदस्य संतोष पटकोटवार यांची उपस्थिती होती.Shri Keteiya Swami Jayanti celebrated at Korpana.
  कोरपना तालुका बुरुड समाज अध्यक्ष पवन बुरेवार, गंगाधर बुरेवार,सागर बुरेवार,रामलाल मादेवार,अमर मादेवार,दिगांबर माजरे,प्रकाश पेंढारकर,मोहन चिलगिलवार,नारायन माजरे,संतोष पदमगिरवार,प्रमोद बुरेवार,सोनाली बुरेवार,वंदना बुरेवार,संगीता बुरेवार, नंदा पारलेवार,सोनाली सुलभेवार,शांताबाई मादेवार, पोचूबाई चिलगिलवार,ईसतारी कुशमवार,गणेश कुशमवार,गंगाधर जोरगेवार,राजू पत्रीवार सह मोठ्यासंख्यने समाज बांधवांची उपस्थिती होती. यावेळी समाज बांधवांनी इतर सदस्यांसह विशेषतः बांबुच्या समस्या मांडल्या.
Shri Keteiya Swami Jayanti celebrated at Korpana.
                          --------//--------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या