Subscribe Us

header ads

मास्टर-ब्लास्टरच्या साधेपणाने जिंकली चाहत्यांची मने.The simplicity of Master-Blaster won the hearts of fans.

कोरपना Live....
#Sachin Tendulkar.
          भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर Sachin Tendulkar सध्या सुट्टीच्या मूडमध्ये आहे. कधी थायलंडचे व्हिडीओ त्याच्या सोशल मीडियावर दिसतील तर कधी राजस्थानचे.मास्टर-ब्लास्टर कुठे आहे याचा अंदाज लावणे चाहत्यांना कठीण होत आहे.मात्र,चाहत्यांना सचिनचे हे व्हिडीओ खूप आवडतात,ज्यामध्ये तो कधी क्याकिंग करताना दिसतोय तर कधी चुलीवर शिजवलेले अन्न खाताना. सचिनने यापूर्वीही त्याच्या इंस्टाग्राम हँडलवरून असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे जो व्हायरल झाला आहे.सध्या तो राजस्थानमध्ये आहे आणि मागच्या दोन दिवसांत त्याने शेअर केलेल्या दोन व्हिडिओंवरून सचिनलाही चुलीवरच्या जेवणाची भुरळ पडल्याचं दिसतंय.तर,दुसऱ्या एका व्हिडिओत तो नवीन खेळ खेळताना दिसतोय.त्याच्या या व्हिडिओवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.Eat food on the stove while sitting on the floor.
     सचिनने गुरूवारी 29 डिसेंबर रोजी एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.यामध्ये राजस्थानात एकाठिकाणी मातीच्या चुलीवर अन्न शिजवला जात आहे.या व्हिडिओत दोन महिला स्वयंपाक करताना दिसत आहेत आणि सचिन त्यांच्याशी बोलताना दिसत आहे.सचिनने व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन दिले आहे. "चुलीवर शिजवलेल्या जेवणाची चव नेहमीच अनोखी असते,” असे त्याने म्हटले.तर,त्या दोन्ही महिलांनी त्या गहू आणि बाजरीची भाकरी बनवत आहे.असे सांगितलं.
    सचिन तेंडुलकर पुढे म्हणाला,“मलाही जेवण तयार करता येतं,पण गोल चपाती करता येत नाही.चुलीवर शिजवलेल्या अन्नाची चव वेगळीच असते.गॅसवर शिजवलेल्या अन्नापेक्षा ते अधिक चविष्ट असते.” अशातच सचिन तूप गूळ घेऊन जेवायला बसतो. त्यावर तो म्हणाला, “मी आयुष्यात इतकं तूप कधीच खाल्लं नाही.हे प्रेमाने भरलेलं तूप आहे.नंतर हे देसी तूप आहे का ?” असेही सचिन त्या महिलांना विचारतो.व्हिडिओवर सचिनचे चाहते, ‘'तुम्ही खूप चांगले व्यक्ती आहात’', "त्या महिलांना माहीत नाही की,त्यांच्या इथे साक्षात क्रिकेटचा देव आला आहे", अशा कमेंट्स चाहते करीत आहे.Eat food on the stove while sitting on the floor.
  सचिनने या आधी बुधवारी ही एका व्हिडिओ शेअर केला होता.तेव्हा तो थायलंडमध्ये सुट्टी घालवत होता. 49 वर्षीय सचिनने थायलंडमध्ये क्याकिंग म्हणजे नौकानयन या खेळातही हात आजमावला. सचिनने वल्ह हातात धरून वल्हवायचं कसं याचेही ट्रेनरकडून धडे घेतले.सचिन म्हणाला की,हे क्रिकेटमधल्या रिव्हर्स स्विंगसारखं आहे आणि तो पहिल्यांदाच या खेळाचा आनंद घेत आहे.
The simplicity of Master-Blaster won the hearts of fans...
Eat food on the stove while sitting on the floor...
                            -------//------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या