गडचांदूर:-@journalists...
गडचांदूर येथील मंगलदास आदे या तरूणाने येथील अंमलनाला डॅम मध्ये आत्महत्या केल्याची घटना 19 डिसेंबर रोजी समोर आली आहे.मंगलदास आदे याला कोणतेही व्यसन नव्हते,तो आपली ड्युटी नियमितपणे करीता होता,पैशाने सुद्धा परिपूर्ण असल्याने त्याला कर्ज घेण्याची काहीही गरज नव्हती, यामुळे त्याच्यावर कोणत्याही सावकाराचे कसलेही कर्ज नाही.मात्र चंद्रपूर येथील एका युट्यूब चॅनलच्या पत्रकारांनी आदे यांच्याबद्दल चुकीची बातमी प्रसारित करून त्याची नाहक बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.या पत्रकारावर कायदेशीर कारवाई करावी,अशी मागणी महात्मा फुले समाज विकास संघटना गडचांदूर व आदे परिवारातर्फे गडचांदूर पोलिस ठाण्यात दिलेल्या लेखी तक्रारद्वारे करण्यात आली आहे.Gadchandur Mahatma Phule Samaj Vikas Association aggressive.चुकीची माहिती पसरवून एका मृत व्यक्ती व समाजाची बदनामी करणाऱ्या त्या पत्रकारावर जर येत्या 8 दिवसात कारवाई न झाल्यास तिव्र आंदोलन उभारण्याचा इशार महात्मा फुले समाज विकास संघटनेचे संतोष महाडोळे,दिलीप नागोसे, गणेश मोहुर्ले,भावराव बोरूले,अविनाश नाकोडे,अतुल आदे आदींनी निवेदनातून दिला आहे. Gadchandur Mahatma Phule Samaj Vikas Association aggressive.

"उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सत्यजित आमले यांच्या नेतृत्वात गडचांदूर पोलिस सतत कारवाई करीत असल्याने याठिकाणी विवीध अवैध धंद्यांवर मोठ्याप्रमाणात अंकुश लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे" हे मात्र विशेष.
Take action against journalists who spread false information about the deceased.
-------//-------
0 टिप्पण्या