Subscribe Us

header ads

वाघांचा बंदोबस्त करा,अन्यथा जनहितार्थ कायदा हातात घेऊ. Take care of the tigers, otherwise we will take public interest law in hand.

चंद्रपूर:-@Tiger.
  चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी,सावली,सिंदेवाही या तालुक्यात वाघांचा हैदोस प्रमाणापेक्षा जास्त वाढला असून गत 3 दिवसात 3 जीव गेले आहे.राज्याचे वनमंत्री हे चंद्रपूर जिल्ह्याचे असूनही येथील वन अधिकारी जागचे हालत नाही! ही अतिशय संतापाची बाबा असून हल्लेखोर वाघांचा त्वरित बंदोबस्त वनविभागाने केला नाही तर जनहितार्थ आम्ही कायदा हातात घेऊ,असा इशारा काँग्रेस नेते,राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री,आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.Vijay Vadettiwar's warning.वाघांच्या बंदोबस्तासाठी येत्या 17 डिसेंबर रोजी वनविभागाची बैठक घेणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.
         अगोदरच वाघांच्या हल्ल्यांमुळे हजारो एकर शेतातील खरीप पिके पडीत राहिले आणि आता वाघांचे हल्ले वाढल्याने शेतकऱ्यांना या क्षेत्रातील रब्बी पिके घेण्यास भिती वाटत असल्याची भयावह परिस्थिती आहे.वाघांची संख्या वाढूनही वेळीच योग्य पाऊल न उचलल्याने आता नागरिकांचे जीव धोक्यात आले आहे.सतत सुरू असलेल्या वाघांच्या हल्ल्यांमुळे सर्वत्र दहशतीचे वातावरण पसरले असून या वाघांचा वनविभागाने त्वरित बंदोबस्त करावा,गावा शेजारील झाडी-झुडपे काढावी,जंगलालगत गावाच्या सिमेवर सोलर दिवे बसवावे,वाढलेल्या वाघांचे त्वरित स्थलांतर करावे,अशा मागण्याही वडेट्टीवार यांनी केल्या आहे. यापुढे वाघांच्या हल्ल्यात कोणत्याही नागरिकाचा बळी गेल्यास मृतकाचे शव उचलू न देता मृतदेह थेट वनविभागाच्या कार्यालयात नेण्यात येइल,असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला आहे.आता वनविभाग यासंदर्भात काय उपाययोजना करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Vijay Vadettiwar's warning....!
Take care of the tigers, otherwise we will take public interest law in hand.
                        --------//-------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या