गडचांदूर:-@Molesting ?
विवीध शहरांमध्ये दिवसाआड विनयभंगाची घटना समोर येत असतानाच कोरपना तालुक्यातील औद्योगिक नगरी नांदाफाटा परिसरातील एका नामांकित शिक्षण संस्था चालकाने एका शिक्षीकेचा विनयभंग केल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.मात्र तो नराधम कोण ? हे मात्र अजूनही अस्पष्ट असून सदर प्रकरण हा नांदाफाटा क्षेत्रातील काही व्हॉट्स ऐप ग्रुप आणि परिसरातील शहर,गावखेड्यात चर्चेचा विषय बनला आहे हे मात्र विशेष.दिवसेंदिवस जबरदस्त चर्चेला उधाण येत असून सदर शिक्षीका गडचांदूर येथील असल्याची तसेच त्या शाळेत तासिके प्रमाणे शिकवणी वर्ग घेत असल्याचे कळते.Discussion ?

सुरू असलेल्या चर्चेतून सविस्तर असे की,मागील 10 ते 12 दिवसापुर्वी नांदाफाटा परिसरातील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या संचालकांकडून त्याच शाळेत शिक्षीका असलेल्या शिक्षीकेवर शाळेतच विनयभंग झाल्याची घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आली आहे.विनयभंग झाला ही गोष्ट त्या पिडीत शिक्षीकेने आपल्या सहाय्यक शिक्षीकेला जावून सांगताच विनयभंगाचे बिंग फुटले. घडलेल्या सदर गैरप्रकारा बद्दल सहाय्यक शिक्षीकेने थेट संस्था चालकाला चांगलेच सुनावले आणि एवढेच नाही तर सर्व शिक्षक वृंदासमोर माफी सुध्दा मागायला लावल्याची चर्चा सुद्धा ऐकायला मिळत आहे.शिक्षण संस्था चालकाकडून विनयभंगाचा गंभीर प्रकार घडल्याचा शाळेतील जवळपास सर्वच विभागाच्या शिक्षकांना माहीत झाले परंतू संस्था चालकाने ''ही गोष्ट शाळे बाहेर जावू नये" यासाठी दम दिल्याची माहिती आहे.असे असताना शेवटी विनयभंगाची गोष्ट बाहेर आली आणि सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली.सदर प्रकरण बाहेर आल्याने संस्था चालक संतापला व यामुळे काही शिक्षक व संस्था चालकामध्ये जबरदस्त "हमरी,तुमरी" झाल्याची चर्चा आहे.
-----//-----
(संस्था चालकाने त्या शिक्षीके सोबत केलेल्या संभाषणाची आडिओ क्लिप सुद्धा मोठ्याप्रमाणात वायरल होत असून त्यामध्ये काही पैशांबद्दल व माफी मांगताना ऐकायला मिळते तसेच ही गोष्ट कुणालाही सांगू नये,असेही त्यात ऐकायला मिळत आहे.आता ही आडिओ क्लिप खरी की खोटी,याच्याशी आम्ही सहमत नाही कृपया नोंद घ्यावी.सदर प्रकरणी खोलवर जाऊन अखेर तो संस्था चालक कोण आणि प्रकरण काय ? याची सत्यता शोधण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे.कारण प्रकरण अतिशय गंभीर आहे.)
Talk about a well-known school manager molesting a teenage teacher ?
-------//-------
0 टिप्पण्या