Subscribe Us

header ads

त्या...!सामाजिक एकतेच्या लढ्यात माजी आ.चटप यांचा सिंहाचा वाटा.That Former Adv.Chatap's lion's share in the fight for social unity.

गडचांदूर:-@Social unity.
 गडचांदूर येथील प्रभाग क्रमांक 5 मध्ये गजबजलेल्या ठिकाणी असलेली जूनी दारू दुकान दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावी यासाठी परिसरातील नागरिक तसेच वंचित बहुजन आघाडीतर्फे मागील 2 ते 3 वर्षापासून लढा उभारण्यात आला होता.अखेर याला यश मिळाले असून काही दिवसापूर्वी सदर दारूची दुकान दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आली आहे.या संपुर्ण लढ्यात social unity माजी आमदार अॕड.वामनराव चटप यांचा सिंहाचा वाटा असून साहेबांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन व सहयोगामुळे या सामाजिक एकतेच्या लढ्यात सकारात्मक विजय मिळाला अशी भावना व्यक्त करत 4 डिसेंबर रोजी स्थानिक बालाजी सेलिब्रेशन हॉल येथे या प्रभागातील महिला,पुरूष नागरिक व वंचित बहुजन आघाडीतर्फे माजी आमदार अॕड.चटप यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष मधुकर चुनारकर,सामाजिक कार्यकर्ते बालाजी पुरी,विनोद मोगरे,चंद्रकला नगराळे,बयाबाई कवलकर,रोशनी मोगरे,अरूण,चुनारकर,ममता ईटनकर व प्रभाग 5 मधील नागरीक व वंचितच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
That...!Former Adv.Chatap's lion's share in the fight for social unity.
                            ------//------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.


              

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या