Subscribe Us

header ads

त्या...!अर्धवट रस्त्यामुळे डोकेदुखी कायम.That Half the road causes headache.

गडचांदूर:-@Ultimatum.
       सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर शासनाच्या हायब्रिड अन्युईटी कार्यक्रमांतर्गत भोयगाव,गडचांदूर, जिवती रस्ता व गडचांदूर,पाटण,वणी राज्यमार्ग 373 रस्त्याचे 74.0 कि.मी. लांबीत सुधारणा करण्यासाठी 29 जूलै 2019 रोजी भूमिपूजन होवून कामाला सुरूवात झाली.मुख्य म्हणजे गडचांदूर येथील अगदी वर्दळीच्या स्व.राजीव गांधी चौक(पेट्रोल पंप चौक) पासून माणिकगड सिमेंट कंपनी गेट पर्यंतच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी खोदण्यात आले. मात्र पुढील कामाला सुरूवात करण्यात आली नाही. तब्बल 1 वर्ष हा रस्ता पहिल्यापेक्षा जास्त खराब झाल्याने नागरिकांना धूळ,खड्डे,चिखलाचा त्रास सहन करावा लागला.काहींनी जीव गमावले तर काहींना अपंगत्व आले.सध्या मागील 6 ते 7 महिन्यापासून रस्ता अर्धवट अवस्थेत पडून असून संबंधित विभाग आणि कंत्राटदाराच्या चुकींमुळे स्थानिक प्रतिनिधींना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे.याच पार्श्वभूमीवर 2 डिसेंबर रोजी आमदार सुभाष धोटे यांनी चंद्रपूर येथे बैठक घेऊन येत्या आठवड्याभरात सदर रस्त्याचे अर्धवट पडलेले काम पुर्ण करा अन्यथा नागरिकांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिला आहे.Agitation with citizens if the work is not completed within a week.
           याविषयी आमदार धोटे यांनी सा.बां.वि.च्या अधिक्षक अभियंता यांना दिलेल्या निवेदनाद्वारे असे की,सदर रस्ता हा गडचांदूरात जाणारा मुख्य मार्ग आहे.रस्त्याच्या एका बाजूने खोदकाम करून गिट्टी पसरलेली आहे.सदर काम गेल्या 6 ते 7 पूर्णतः बंद असल्याने रस्त्याच्या बाजूला असलेली लहान मोठी, किरकोळ दुकाने बंद आहे.परिणामी दुकानदार व त्यांच्यावर अवलंबून असलेला गरीब नोकर वर्गावर बेरोजगारी व उपासमारीची वेळ आली आहे.रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे.नागरिकांकडून वारंवार रस्त्याचे काम तातडीने करण्याची मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित कंत्राटदार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.त्यामुळे शहरातील नागरिक व रस्त्यालगत असलेले दुकानदार आम्हा लोकप्रतिनिधीविरोधात सातत्याने ओरड करीत आहे.आठवड्याभरात सदर रस्त्याचे काम पुर्ण न झाल्यास गडचांदूर शहरातील नागरिकांसह आंदोलन करू,असा इशारा आ.सुभाष धोटे यांनी दिला आहे. An eight-day ultimatum.
     गडचांदूर शहरात व जिवती तालुक्याकडे जाणार्‍या या रस्त्यावर दररोज लहानमोठे अपघात घडत असल्याने हा अपघात मार्ग म्हणून ओळखला जायचा. अनेकदा विवीध पक्षाचे नेते,सामाजसेवक व सुज्ज्ञ नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला तक्रारी केल्या,आंदोलने सुद्धा झाली तरीपण शासनप्रशासन याकडे लक्ष देत नसल्यामुळे लोकांनी या रस्त्याची जणू आशाच सोडली होती.माजी आमदार अॕड.संजय धोटे यांनीही सदर रस्त्याची अवस्था पाहून आंदोलनाचा इशारा दिला होता तर आमदार सुभाष धोटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्वरित कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते.त्यानंतर तडकाफडकी कामाला सुरूवात झाली. मात्र एका बाजूचे सिमेंट काँक्रिटीकरण झाले आणि दुसरी बाजू नागरिकांच्या डोक्याला ताप बनली आहे. अशा परिस्थितीत आत पुन्हा आमदार सुभाष धोटे यांनी संबंधितांना धारेवर धरून आठ दिवसाचा अल्टीमेटम दिल्याने संबंधीत विभाग व संबंधीत कंत्राटदार याला किती गांभीर्याने घेतात याकडे लक्ष लागले आहे.
MLA Subhash Dhote's warning to protest.
An eight-day ultimatum.
Agitation with citizens if the work is not completed within a week.
                         --------//--------
  मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या