Subscribe Us

header ads

त्या,कार्यवाहीला स्‍थगीती. That,adjournment of proceedings.

चंद्रपूर:-@Collector's orders.
चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी जिल्‍ह्यातील गायरान जमीनीवरील अतिक्रमण निष्‍कासनाच्‍या कार्यवाहीला स्‍थगीती दिली असून त्यांनी 12 डिसेंबर रोजी सर्व तहसिलदारांना लेखी पत्रद्वारे याविषयी सुचना दिल्‍या आहे.Collector Vinay Gowda postponed the encroachment eviction proceedings.गायरान जमीनीवरील कृती आराखड्यानुसार निष्‍कासन करण्‍याची सुरू असलेली कार्यवाही स्‍थगीत करण्‍याचे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.मंत्री मंडळ बैठकीत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे लक्ष याकडे वेधले होते.या संबंधी गायरान जमीनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्‍याबाबत राज्‍य सरकार सकारात्‍मक असल्‍याचे मुख्‍यमंत्री व उपमुख्‍यमंत्र्यांनी स्‍पष्‍ट केले होते.या संदर्भात मा.मुंबई उच्‍च न्‍यायालय यांनी अतिक्रमण निष्‍कासन करण्‍याच्‍या कार्यवाही संदर्भात पुढील आदेश होईपर्यंत निष्‍कासन करण्‍याची कार्यवाही करण्‍यात येवू नये,असे स्‍पष्‍ट केले.त्‍यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तहसिलदारांना अतिक्रमण निष्‍कासनाच्‍या कार्यवाहीला स्‍थगीती देण्‍याच्‍या सुचना दिल्‍या.यामुळे चंद्रपूर जिल्‍ह्यातील संबंधीत नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून यामुळे गायरान जमीनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल होतील व नागरिकांना योग्‍य न्‍याय मिळेल,असा विश्‍वास पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त करत उच्च न्यायालयाच्या निर्देशाचे स्वागत केले आहे.
Collector Vinay Gowda postponed the encroachment eviction proceedings.
District Collector gave orders to all Tehsildars.
                        --------//-------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या