Subscribe Us

header ads

वर्दळीच्या ठिकाणी महिला पोलीसांची नेमणूक गरजेचे. There is a need to appoint women policemen in busy places.

गडचांदूर:-@BJP Mahila Aghadi..
        कोरपना तालुक्यातील औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या गडचांदूर शहराची लोकसंख्या 40 हजारांच्या जवळपास आहे.याठिकाणी मोठी अशी बाजारपेठे असून शाळा,महाविद्यालय,दवाखाने,बँका असल्याने शहरात नेहमी नागरिकांची वर्दळ पहायला मिळते.आठवडी बाजाराच्या दिवशी मोठ्याप्रमाणात परिसरातील महिला विवीध वस्तू खरेदी करण्यासाठी तसेच मुली शिक्षणाचे धडे घेण्यासाठी दररोज येथे येतात.अशावेळी काही टवाळखोर मुलांकडून यांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागतो.विशेषता: बसस्थानक परिसरात बसच्या प्रतिक्षेत असलेल्या विवीध खेडे गावातली शाळकरी मुलींना या मुलांकडून मोठ्याप्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.नुकतेच येथील महात्मा गांधी विद्यालय समोर एका इसमाने भरदिवसा दुपारच्या सुमारास वर्दळीच्या ठिकाणी दुसऱ्या इसमावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली.या घटनेमुळे महिला वर्ग व शाळकरी मुली कमालीच्या भयभीत असल्याचे दिसून येत आहे.अशा परिस्थितीत भविष्यातील अनपेक्षित घटना टाळण्यासाठी व महिला संरक्षणाच्या दृष्टीने आठवडी बाजार,छत्रपती शिवाजी महाराज चौक,बसस्थानक,शेडमाके चौक,या वर्दळीच्या ठिकाणी महिला पोलीस कर्मचारी उपस्थित असने गरजेचे असून लवकरात लवकर याठिकाणी महिला पोलीसांची नेमणूक करावी अशी मागणी भाजपा महिला आघाडी जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्षा सौ.विजयालक्ष्मी डोहे यांनी ठाणेदार सत्यजित आमले यांच्याकडे निवेदनातून केली आहे. यावेळी सौ.डोहे सोबत सौ.रंजना मडावी,सौ.सपना सेलोकर,सौ.शितल धोटे यांची उपस्थिती होती. यासंदर्भात आता ठाणेदार काय भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
There is a need to appoint women policemen in busy places...
                           --------//-------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या