Subscribe Us

header ads

महाराष्ट्रात आढळल्या दोन सोन्याच्या खाणी.Two gold mines found in Maharashtra.

चंद्रपूरः-@gold mining.
       महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात सोन्याच्या खाणी सापडल्याची माहिती समोर येत आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील मिंझरी आणि बामणी या भागात सोन्याच्या दोन खाणी आढळून आल्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिला आहे. Two gold mines found in Maharashtra. चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोळशाच्या खाणी आहे.त्यानंतर आता भूगर्भात तांबे आणि सोन्याच्या खाणीही आहे.केंद्र सरकारच्या खनिकर्म विभागाचा अहवाल असल्याची माहिती राज्याच्या खनिकर्म विभागाकडून देण्यात आली आहे. त्यादृष्टीने खनिकर्म विभागाने चाचणी सुरू केली आहे.एका वृत्तपत्राने याबाबतची माहिती दिली असून राज्यात सोन्याच्या खाणी असल्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात दिले होते.राज्यात खनिकर्म संशोधन संस्था सुरू करून या व्यवसायातील अडचणी दूर करुन राज्याच्या महसूलात वाढ झाली पाहिजे,असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते.त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्ट केले तसेच राज्यात सोन्याचे दोन ब्लॉक असल्याची माहिती केंद्रीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. 
         "आमच्या सरकारच्या काळात हे सोने निघाले तर ती राज्यासाठी खूप मोठी उपलब्धी असेल" असे मुख्यमंत्री म्हणाले.राज्यात खनिकर्म क्षेत्राला मोठा वाव असून गडचिरोली सारख्या दुर्गम भागात देशातील सर्वात मोठा स्टील प्रकल्प सुरू करू शकतो,असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.दरम्यान चंद्रपूर येथील गोंडपिपरी तालुक्याच्या भूगर्भात मौल्यवान प्लॅटिनम,सोने आणि दुर्मिळात दुर्मिळ म्हणून ओळखले जाणारे रूथेनियम, रेडिअम,इरेडिअम धातू असल्याचे दहा वर्षांपूर्वी झालेल्या एका संशोधनातून समोर आले आहे.भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाच्या शास्त्रज्ञांनी तालुक्यात 2007 ते 2010 मध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेत हे उघड झाले होते.
Two gold mines found in Maharashtra.
Chief Minister gave important information.
                         --------//-------
 मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या