Subscribe Us

header ads

विदर्भवादी धडकले विधान भवनावर,अन्यायाविरोधात व्यक्त केला संताप.Vidarbha activists stormed the Vidhan Bhawan, expressed their anger against injustice.

नागपूर:-@Different Vidarbha.?
       विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनावर विदर्भवाद्यातर्फे हल्लाबोल मोर्चा आंदोलन केले गेले. भव्य अशा मोर्चाची सुरवात यशवंत स्टेडियमपासून करण्यात आली.बराच वेळ टी पॉइंटवर विदर्भवादी बसून राहिले.शिष्टमंडळाला भेटायला बोलावण्यात आले मात्र विदर्भवाद्यांनी विदर्भात अधिवेशन असताना कॅबिनेट मंत्र्यांनी भेटायला यावे असा हट्ट धरला.परंतू सरकारने तो आग्रह नाकारल्याने अखेर सरकारचा निषेध करण्यात आला.विदर्भाचा आवाज बुलंद करणाऱ्या या आंदोलनात विदर्भवादी नेते,माजी आमदार अॕड.वामनराव चटप,देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे,रंजनाताई मामर्डे,ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर कोंडबतुनवार,सुनील चोखारे,घनश्याम फुसे, गणेश शर्मा,नौशाद हुसैन,अहमद कादर,माजी मंत्री डॉ. रमेश गजबे,उपेंद्र शेंडे,मोरेश्वर टेंभुर्डे,अॕड.मुकेश समर्थ, नीरज खांदेवाले,सरोजताई काशीकर,मुकेश मासुरकर आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.Different Vidarbha...?
      केंद्र सरकारने विदर्भ राज्याच्या तात्काळ निर्माण करावा,अन्नधान्न्यावरील तात्काळ GST मागे घ्यावी, राज्य सरकारने जाचक वीज दर रद्द करावी, विदर्भातील 11 ही जिल्ह्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा.बल्लारपूर,सूरजागढ रेल्वेमार्ग केंद्र सरकारने तात्काळ मंजुरीसह आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून द्यावा,विदर्भातील गायरान जमिनीवरचे शेतकरी व रहिवासीयांचे अतिक्रमण त्वरित नियमित करून त्यांना कायमस्वरूपी पट्टे द्यावेत,विदर्भ वैधानिक मंडळ नको,आता आम्हाला विदर्भ राज्यच हवा,अशी मागणी जोरकसपणे यावेळी करण्यात आली.टी पॉईंट परिसरात मोर्चा अडविण्यात आल्यानंतर विदर्भवाद्यांनी बराच वेळ त्याठिकाणी ठिय्या देत सरकार विरोधात जोरदार घोषणा दिल्या.
Different Vidarbha...?
Vidarbha activists stormed the Vidhan Bhawan,expressed their anger against injustice.
                         ---------//--------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या