Subscribe Us

header ads

विधिमंडळ अधिवेशनाचे सूप वाजणार ? Vidhimandal Adhiveshanche Sup Vajnar ?

नागपूरः-@Winter session..
          आॕरेंजसिटी नागपूरात सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढविण्यात यावा,अशी मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात आली.मात्र,28 डिसेंबर रोजी पार पडलेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विरोधकांची मागणी फेटाळण्यात आली असून अधिवेशन आता नियोजित कालावधीतच म्हणजे 30 डिसेंबरलाच संपणार असल्याचे स्पष्ट होत आहे.? गेल्या 19 डिसेंबर पासून नागपूरात हिवाळी अधिवेशनाची सुरूवात झाली.अधिवेशनाचा कालावधी अपुरा असल्याने कालावधी वाढविण्यात यावा,अशी मागणी सुरूवाती पासून विरोधकांकडून सुरू होती. अधिवेशनात नेत्यांचे घोटाळे,त्यांच्यावरचे आरोप-प्रत्यारोप या विषयांवरच मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली.त्यामूळे जनतेचे प्रश्न मागे पडल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आला होता.यामूळे अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यात यावा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती.मात्र, कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ही मागणी फेटाळण्यात आली.त्यामुळे आता हिवाळी अधिवेशन 30 तारखेला म्हणजे ठरलेल्या कालावधीत संपणार असल्याचे दिसून येत आहे.19 डिसेंबर रोजी अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होणार असल्याचे कळते.
The soup of the legislative session will sound on December 30.
                  "आमची तयारी होती"
                           "दरेकर"
यासंदर्भात बोलताना आमदार प्रवीण दरेकर म्हणाले, संसदीय कामकाज समितीच्या बैठकीत अधिवेशन 30 तारखेपर्यंत घेण्याचा निर्णय झाला आहे.हा निर्णय विरोधकांच्या समन्वयाने झाला आहे.विरोधकांची मानसिकता अधिवेशन कालावधी वाढवण्याची असती तर आमचीही तयारी होती.परंतू 30 तारखेपर्यंत अधिवेशन आटोपण्याचा निर्णय विरोधकांच्या समन्वयाने झाला आहे,असेही त्यांनी स्पष्ट केले.
The soup of the legislative session will sound on December 30.
                         --------//-------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या